मिरज (जिल्‍हा सांगली) येथील सेवाभावी वृत्तीचा आणि विनम्र असलेला कु. राम राघवेंद्र आचार्य (वय १७ वर्षे) याने गाठली ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र चालवणारी पिढी ! कु. राम आचार्य हा या पिढीतील आहे !

कु. राम आचार्य
वर्ष २०१९ मध्‍ये ‘कु. राम आचार्य उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आला असून त्‍याची आध्‍यात्मिक पातळी ५९ टक्‍के आहे’, असे घोषित करण्‍यात आले होते. वर्ष २०२३ मध्‍ये त्‍याची आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के झाली आहे. त्‍याच्‍यावर पालकांनी केलेले योग्‍य संस्‍कार, त्‍याची साधनेची तळमळ आणि त्‍याच्‍यातील भाव यांमुळे आता त्‍याची साधनेत प्रगती होत आहे.’

– सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२७.६.२०२३)   

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले   

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मिरज – सेवाभावी वृत्ती, विनम्र, तसेच अन्‍य गुणांचा समुच्‍चय असणारा मिरज येथील कु. राम राघवेंद्र आचार्य (वय १७ वर्षे) याने ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठली, असे सनातनच्‍या साधिका सौ. कल्‍पना थोरात यांनी १ जुलैला घोषित केले. सनातन संस्‍थेच्‍या ब्राह्मणपुरी येथील आश्रमात झालेल्‍या सत्‍संग सोहळ्‍यात त्‍यांनी हे घोषित केले. येथील सनातनचे साधक श्री. रमेश लुकतुके (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के) यांनी भेटवस्‍तू देऊन त्‍याचा सत्‍कार केला. या प्रसंगी कु. राम याचे वडील श्री. राघवेंद्र आचार्य, त्‍याची आई सौ. जयश्री आचार्य, भाऊ कु. कृष्‍ण, तसेच कु. रामची आत्‍या कु. माधवी आचार्य अन् कु. सुरेखा आचार्य उपस्‍थित होत्‍या.

कु. राम आचार्य याचा भेटवस्तू देऊन सत्कार करतांना श्री. रमेश लुकतुके (डावीकडे)
श्री. राघवेंद्र आचार्य

या प्रसंगी मनोगत व्‍यक्‍त करतांना कु. सुरेखा आचार्य (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के) म्‍हणाल्‍या, ‘‘कु. राममध्‍ये समजूतदारपणा, इतरांचा विचार करणे, गुरुभेटीची तळमळ हे गुण जाणवतात.’’ कु. संगिता जाधव म्‍हणाल्‍या, ‘‘कु. राममध्‍ये आश्रमात सेवेसाठी आल्‍यावर कार्यपद्धतीचे पालन करणे, परिपूर्ण सेवा करणे, चिकाटी, शिकण्‍याची वृत्ती यांसह अनेक गुण जाणवतात. तो नेहमी हसतमुख असतो, तसेच कोणतीही सेवा करण्‍यापूर्वी ती पूर्णत: समजून घेतो.’’

कु. राम आचार्य याच्‍यामध्‍ये जाणवलेले पालट !

१. ‘रामचा शाळेत आणि घरात साहाय्‍य करण्‍याचा भाग वाढला आहे.

२. तो शाळेत आणि घरातही इतरांचा विचार करून वागतो.

३. तो इतरांची चूक नम्रतेने सांगतो.

४. त्‍याचा आत्‍मविश्‍वास वाढला आहे.’

– श्री. राघवेंद्र आचार्य (कु. राम आचार्य याचे वडील), कमला जगन्‍नाथ आर्केड, ब्राह्मणपुरी, मिरज. (१८.६.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.