
हिंदूंचे हे राष्ट्रीय नव्हे,
तर ‘वैश्विक हिंदु अधिवेशन’ ।
होत आहे विश्वाची ‘हिंदु राष्ट्रा’च्या दिशेने वाटचाल ॥ १ ॥
हिंदुत्वाच्या विचारांना येते,
आपोआप धार ।
हिंदुत्व जिवंत ठेवण्यासाठी आहे, हा एक आधार ॥ २ ॥
पुरोगामी आणि निधर्मी यांची विचारांची तलवार होते म्यान (टीप) ।
भ्रष्ट अन् सत्तापिपासू राजकारण्यांना धडकी भरते उरात ॥ ३ ॥
धर्मद्रोही अन् हिंदुद्वेषी यांच्या विरोधाला मिळते एक धार ।
हिंदूंमध्ये फूट पाडणार्यांवर चालवू हिंदु ऐक्याचा वार ॥ ४ ॥
चला हिंदूंनो, श्रीकृष्णाला साक्षी मानून शपथ घेऊया ।
भारतालाच नव्हे, तर सारे ‘विश्व’ हिंदु राष्ट्र करूया ॥ ५ ॥
श्रीमन्नारायणाच्या कार्याला गोप-गोपींप्रमाणे काठ्या लावूया ।
अंतर आणि बाह्य मनात धर्माचरणरूपी हिंदु राष्ट्र आणूया ॥ ६ ॥
हिंदु राष्ट्राचे ध्येय अंतर्मनात तेवत ठेवून कार्यप्रवण होऊया ।
भगवान श्रीकृष्णाला शरण जाऊनी धर्माचा लढा त्वेषाने लढूया ॥ ७ ॥
या घोर कलियुगात अवनीवर पुन्हा हिंदु राष्ट्र येईल ।
श्रीमन्नारायणाच्या संकल्पाने
ही हिंदु भूमी सुजलाम् सुफलाम् होईल ॥ ८ ॥
टीप – तलवार होते म्यान : सर्व पर्याय करून थकणे
– श्रीविष्णुर्पणमस्तु
श्री. अविनाश जाधव (आध्यात्मिक पातळी ६० टक्के), सनातन आश्रम, गोवा. (१३.६.२०२३)
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
‘भिऊ नकोस माझ्या बाळा, मी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) तुझ्या पाठीशीच सदा ।
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
मुसलमानांनी पूर्वजांच्या परंपरा स्वीकारल्यास त्यांना हिंदु राष्ट्रात कोणताही धोका नसेल ! – Yogrishi Ramdev baba
पंचमहाभूतांमधील असंतुलन : कलियुगातून सत्ययुगाकडे वाटचाल !