जुनागड (गुजरात) येथे अनधिकृत दर्गा पाडण्याची नोटीस दिल्यावर धर्मांध मुसलमानांकडून हिंसाचार !

  • १ जण ठार, अनेक जण घायाळ

  • पोलीस उपअधीक्षकांसह ४ पोलीस घायाळ

(दर्गा म्हणजे मुसलमानाच्या थडग्याच्या भोवती केलेले बांधकाम)

जुनागड (गुजरात) – येथे अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या दर्ग्याच्या विरोधात महापालिकेने नोटीस बजावल्याने ३०० हून अधिक धर्मांध मुसलमानांनी येथे १५ जूनच्या रात्री प्रचंड हिंसाचार केला. त्यांनी पोलीस चौकीला लक्ष्य करत पोलिसांवर आक्रमण केले. यात पोलीस उपअधीक्षकासह ४ पोलीस घायाळ झाले. त्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. तसेच अन्य वाहने जाळण्यात आली. मोठ्या प्रमाणात दगडफेकही करण्यात आली. या वेळी धर्मांध मुसलमानांकडून ‘अल्लाहू अकबर’च्या (‘अल्ला महान आहे’च्या) घोषणा दिल्या जात होत्या. पोलिसांनी बचावासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला. हिंसाचाराच्या प्रकरणी आतापर्यंत १७४ जणांना अटक करण्यात आली आहे. हिंसाचाराच्या घटनेचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले.

दर्गा हटवण्यासाठी ५ दिवसांची समयमर्यादा देण्यात आली होती. नोटिसीला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर प्रशासनाने कारवाईचा निर्णय घेतला. १६ जूनला सायंकाळी महापालिकेचे पथक दर्गा पाडण्याची नोटीस लावण्यासाठी पोचले होते, त्याविरोधात धर्मांध मुसलमानांनी गर्दी केली होती. त्यांनी रस्त्यावरून जाणार्‍या बसच्या काचा फोडल्या. त्यामुळे बसमधील प्रवासी घायाळ झाले. यानंतर पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आणि मोटारसायकलीही जाळण्यात आल्या.

संपादकीय भूमिका

  • अनधिकृत बांधकाम करून वर शिरजोरी करणार्‍यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, हेच यातून लक्षात येते !
  • अनधिकृत बांधकाम करण्यात येत असतांनाच कारवाई का करण्यात आली नाही, याचाही शोध घेण्याची आवश्यकता आहे !
  • गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना धर्मांधांचे हिंसाचार करण्याचे धाडस होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !