‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या वेळी श्री. मिलिंद पोशे यांना जाणवलेली सूत्रे !

श्री. मिलिंद पोशे

१. जाणवलेली सूत्रे

अ. गोवा येथील वर्ष २०२२ च्या ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या ठिकाणी पुष्कळ चैतन्य जाणवत होते.

आ. सभागृह आणि भोजनगृह येथे शांतीची अनुभूती येत होती.

इ. अधिवेशनाच्या सेवत सहभागी सर्व साधक पुष्कळ आनंदी दिसत होते.

ई. साधक इतक्या आनंदाने सेवा करत होते की, त्यांच्याकडे पाहिल्यावर आणि बोलतांना माझा भाव जागृत होत होता.

उ. सेवा करणार्‍या साधकांना पाहून अधिवेशनासाठी आलेल्या धर्माभिमान्यांनाही ‘साधक एवढे आनंदी कसे आहेत ?’ याचे आश्चर्य आणि कुतूहल वाटत होते.

ऊ. धर्माभिमान्यांनीही त्यांना उत्साह आणि चैतन्य जाणवत असल्याचे सांगितले.

ए. अनेक धर्माभिमान्यांशी बोलतांना आणि त्यांचे धर्मजागृतीविषयक प्रयत्न ऐकतांना मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती अन् माझा भाव जागृत होत होता. आमच्या डोळ्यांतील त्यांच्याविषयीचे भावाश्रू पाहून त्यांचाही भाव जागृत होत होता.

ऐ. अनेक जण सहस्रो किलोमीटर प्रवास करून आले होते. ‘इतक्या लांबून देवच त्यांना घेऊन आला आहे’, असे जाणवत होते.

ओ. त्यांच्याशी बोलतांना ‘आमच्या हृदयातील परात्पर गुरु डॉक्टर त्यांच्या हृदयातील परात्पर गुरु डॉक्टरांशी संवाद साधत आहेत’, असे मला जाणवले. किंबहुना चैतन्यच चैतन्याशी संवाद साधत असल्याचे मला जाणवले.

औ. सर्व साधक अतिशय आनंदी आणि तेजस्वी दिसत होते. ही भावपूर्ण सेवा ते केवळ गुरूंच्या कृपेने करत असल्याचे जाणवले.

अं. आजपर्यंत मी एवढा आनंद कधीच अनुभवला नव्हता.

२. ‘स्वेच्छेचा त्याग करून परेच्छा स्वीकारल्यानंतर ईश्वरेच्छेचा बोध  होतो’, याविषयी आलेली अनुभूती

२ अ. अधिवेशनासाठी सभागृह क्र. १ मधून सभागृह क्र. २ मध्ये बसण्यास सांगितल्यावर स्वेच्छा असल्यामुळे दु:ख होणे : ‘अधिवेशनाच्या वेळी सभागृह १ आणि सभागृह २ अशा दोन ठिकाणी बैठक व्यवस्था केली होती. मी सभागृह १ मध्ये, म्हणजे मुख्य सभागृहात बसलो होतो. त्या वेळी एका साधकाने येऊन मला सभागृह २ मध्ये बसायला सांगितले. त्या वेळी माझ्या मनात स्वेच्छा असल्यामुळे मला थोडे दु:ख झाले.

२ आ. वारंवार बसण्याची जागा पालटावी लागणे : नंतर मी सभागृह २ मध्ये चांगली जागा पाहून पहिल्या रांगेत जाऊन बसलो. काही वेळानंतर तेथे साधक आले त्यांनी मला तेथून उठवले आणि मला पुन्हा मागे जाऊन बसावे लागले. असे थोड्या थोड्या वेळानंतर सतत चालू होते. काही ना काही कारणास्तव मला पुष्कळ वेळा माझ्या जागेवरून उठावे लागत होते.

२ इ. शिकण्याची वृत्ती जागृत रहाण्यासाठी आणि गुरुदेवांचे सतत स्मरण होण्यासाठी प्रार्थना केल्यानंतर एका साधकाने पुन्हा सभागृह क्र. १ मध्ये बसायला सांगणे : मी गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘हे गुरुदेव, आपण मला कुठेही बसायला सांगावे; परंतु जेथे मला बसायला सांगितले जाईल, तेथे मी बसल्यानंतर माझ्या मनात सतत शिकण्याची वृत्ती टिकून राहू दे आणि मला आपले सतत स्मरण होऊ दे.’ मी अशी प्रार्थना केल्यानंतर एका साधकाने मला पुन्हा सभागृह क्र. १ मध्ये बसायला सांगितले.

२ ई. ‘गुरुदेव आपला मनोलय करण्यासाठीच प्रसंग घडवतात’, हे शिकायला मिळणे : या प्रसंगातून मला शिकायला मिळाले की, ‘जेव्हा आपण स्वेच्छेचा त्याग करतो आणि परेच्छा स्वीकारतो, तेव्हा ईश्वराच्या इच्छेचा बोध होतो. गुरुदेव आपला मनोलय करण्यासाठीच असे प्रसंग घडवतात. जर आपल्याला गुरुदेवांच्या चरणांचाच ध्यास असेल, तर आपण अन्य कोणताही विचार न करता त्यांनाच शरण जायला पाहिजे.’

आपत्काळात या अभूतपूर्व अधिवेशनाला उपस्थित रहाण्याची संधी दिल्याबद्दल परात्पर गुरुमाऊली, सद्गुरु आणि संत यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

– श्री. मिलिंद पोशे, पनवेल, रायगड. (२५.९.२०२२)