छत्रपती संभाजीनगर येथे ७ वर्षीय मुलीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला अटक !

( प्रतिकात्मक छायाचित्र )

छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील सिल्लोड शहरातील एका ७ वर्षीय  मुलीवर तिच्या वडिलांच्या २५ वर्षीय मुसलमान मित्राने ५० रुपयांचे आमीष दाखवून बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी शेख मुनवर उपाख्य मंनू अनीस शेख या आरोपीला सिल्लोड पोलिसांनी अटक केली आहे. मुलीच्या आईने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

शेख याने मुलीवर बलात्कार करून हे कुणाला न सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे भीतीपोटी या मुलीने याविषयी कुणालाच काही सांगितले नाही; परंतु ९ जून या दिवशी त्रास होऊ लागल्याने तिने आईला सांगितले. आईने तिला रुग्णालयात नेले असता आधुनिक वैद्यांनी पडताळून मुलीवर बलात्कार झाल्याचे सांगितले. त्यानंतर आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर तिने सर्व घटनाक्रम सांगितला.

संपादकीय भूमिका 

  • अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये ! 
  • अशा घटनांविषयी काँग्रेस, साम्यवादी पक्ष, समाजवादी पक्ष, बसप, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी किंवा इस्लामी संघटना तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !