सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे अल्पवयीन हिंदु युवतीवर ५ मुसलमानांनी केला सामूहिक बलात्कार

सीतापूर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील सीतापूरमध्ये अल्पवयीन हिंदु युवतीवर ५ मुसलमान तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींवर ‘पॉक्सो’ आणि ‘रासुका’ कायद्यांच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ही घटना सीतापूरच्या रामकोट येथील आहे. पीडितेच्या भावाने सामूहिक बलात्काराच्या प्रकरणी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, ‘४ जून या दिवशी माझी १५ वर्षांची बहीण शौचासाठी घराबाहेर गेली होती. त्या वेळी रिझवान आणि टेलर या मुसलमान तरुणांनी त्यांच्या इतर तीन मुसलमान सहकार्‍यांसह तिला घेरले. पाचपैकी तिघांनी तिचे हात-पाय पकडले. यानंतर त्यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला !’

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक हिंदु संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी निष्पक्ष अन्वेषण करण्याची मागणी हिंदु संघटनांनी केली आहे.

संपादकीय भूमिका

अशा वासनांधांना फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे !