छत्तीसगड येथे गायीवर अत्याचार करणार्‍या मुसलमानाला अटक !

गायीवर अत्याचार करणाऱ्या हसन खानला अटक

नागपूर – छत्तीसगड राज्यातील भिलाई पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात येणार्‍या जामूल येथील एका गायीवर अत्याचार करून पसार झालेला आरोपी हसन खान (रा. जामूल, भिलाई ह.मु.) याला गोंदिया पोलिसांनी अटक केली. ज्ञानेश्‍वरी एक्सप्रेसमधून तो गोंदियाकडे जात होता.

देहली येथून आलेला हसन खान त्याच्या नातेवाईकांसमवेत छत्तीसगडमधील भिलाई जिल्ह्यातील जामूल येथील गृहनिर्माण मंडळातील भाड्याच्या घरात रहात होता. तो कपडे विक्रीचा व्यवसाय करत होता. या नराधमाने २७ मेच्या रात्री एका गायीवर अत्याचार केला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चित्रित झाला आणि तो व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला. घटनेनंतर जामूल येथील विविध सामाजिक आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी यास विरोध करत निदर्शने केली होती, तसेच आरोपीला पकडून कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली होती.

संपादकीय भूमिका

  • सरकारने अशांना आजन्म कारागृहात पाठवले पाहिजे !
  • अशा घटनांच्या वेळी प्राणीप्रेमी कुठल्या बिळात जाऊन लपतात ?