परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ८० व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त असलेल्‍या रथोत्‍सवात सहभागी होण्‍यापूर्वी, सहभागी झाल्‍यावर आणि रथोत्‍सवानंतर सौ. सुचेता नाईक यांना आलेल्‍या अनुभूती

१. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या ४ दिवस आधी आलेली अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१ अ. पंढरपूर येथे म्‍हटल्‍या जाणार्‍या भूपाळीमधील २ ओळी स्‍मरून त्‍या म्‍हटल्‍या जाणे : ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त असलेल्‍या मंगलमय रथोत्‍सवात सहभागी होण्‍यापूर्वी ४ दिवस गुरुदेवांच्‍या पादुकांची मानसपूजा करतांना मला पांडुरंगाच्‍या भूपाळीमधील पुढील २ ओळींचे सतत स्‍मरण होत होते.

ऊठ पंढरीच्‍या राजा वाढवेळ झाला ।
थवा वैष्‍णवांचा दारी दर्शनासी आला ॥

सौ. सुचेता नाईक

१ आ. ‘संत जनाबाईने देवाची दृष्‍ट काढली’, त्‍या ओळी म्‍हटल्‍या जाणे : पंढरपूरला भक्‍त पांडुरंगाची दृष्‍ट काढतांना संत जनाबाईंनी ‘देवाचे लिंबलोण कसे उतरवले ?’, ते म्‍हणतात. तेही माझ्‍याकडून म्‍हटले जायचे.

कोणाची झाली दृष्‍ट माझ्‍या पंढरीराया,
उतरीते लिंब लोण, कोमेजली काया ।
आली राधिका पहाया, माझ्‍या पंढरीराया ।
हाती घेऊनी मोहर्‍या मीठ, जनाबाई काढी दृष्‍ट । – संत जनाबाई

१ इ. पंढरपूर येथे रुक्‍मिणीची दृष्‍ट काढतांना म्‍हटल्‍या जाणार्‍या ओळी स्‍मरून, त्‍या म्‍हणतांना तशी कृतीही केली जाणे : मी गुरुदेवांच्‍या पादुकांच्‍या मानसपूजेनंतर श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना मानस नमस्‍कार करते. पंढरपूरला धूपारतीच्‍या वेळी महिला रुक्‍मिणीची दृष्‍ट काढतांना पुढील ओळी म्‍हणत स्‍वतःचा पदर रुक्‍मिणीच्‍या डोक्‍यापासून पायापर्यंत उतरवतात.

‘आई माझे अंबिकेची दृष्‍ट काढू योगे प्रेमे गावू या ॥’

मला त्‍या ओळी आठवून माझ्‍याकडून श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांची तशी दृष्‍ट काढली जात असे. इतर वेळी गुरुदेवांच्‍या पादुकांची मानसपूजा करतांना मला असे काही आठवल्‍याचे स्‍मरत नाही.

२. देवाने ‘भूपाळीचे स्‍मरण का करून दिले ?’, ते लक्षात येणे

२२.५.२०२२ या दिवशी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ८० व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त रथोत्‍सव साजरा झाला. या रथोत्‍सवाच्‍या वेळी रथोत्‍सवाच्‍या मार्गावर दुतर्फा उभ्‍या असलेल्‍या साधकांना पाहून देवाने ‘ऊठ पंढरीच्‍या राजा’, या भूपाळीचे का स्‍मरण करून दिले ?’, ते माझ्‍या लक्षात आले. खरोखरच पुष्‍कळ साधक गुरुदेवांच्‍या दर्शनासाठी आले होते.

३. रथोत्‍सवाची सेवा करतांना आलेल्‍या अनुभूती

३ अ. हात दुखत असतांना काही साधिकांना नऊवारी साडी नेसवण्‍याची सेवा केल्‍यावर हात दुखण्‍याचे प्रमाण उणावणे : माझा उजवा हात पुष्‍कळ दुखत होता; म्‍हणून आधुनिक वैद्यांना हात दाखवल्‍यावर औषध देऊन त्‍यांनी मला सांगितले, ‘‘हाताची फार हालचाल करू नका’’; मात्र रथोत्‍सवानिमित्त काही साधिकांना नऊवारी साडी नेसवायची होती. ‘ही सेवा तुम्‍हाला जमत असेल, तरच करा’, असा निरोप मला मिळाला होता; परंतु माझ्‍या मनात विचार आला, ‘असाही हात दुखतच आहे. सेवा करून हात दुखला, तर निदान या सेवेत खारुताईप्रमाणे सहभागी झाल्‍याचा आनंद तरी मिळेल’ आणि काय आश्‍चर्य ! त्‍या दिवशी नऊवारी साड्या नेसवण्‍याची सेवा करूनही नेहमीपेक्षाही हात दुखण्‍याचे प्रमाण न्‍यून होते.

३ आ. रथोत्‍सवात चालून पाय न दुखणे : गुरुदेवांच्‍या (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या) कृपेने मला रथोत्‍सवात सहभागी होण्‍याची संधी मिळाली. एरव्‍ही मला चढ चढल्‍यावर दम लागतो आणि पायही दुखतात; परंतु त्‍या दिवशी रथोत्‍सवात २ घंटे पूर्ण वेळ चालूनही माझे पाय दुखले नाहीत किंवा मार्गावरील चढ चढूनही मला दम लागला नाही.

मला या सेवेतून आणि रथोत्‍सवात सहभागी होऊन पुष्‍कळ आनंद मिळाला.

४. अभूतपूर्व रथोत्‍सवात सहभागी होण्‍याची संधी मिळाल्‍यासाठी स्‍वतःला भाग्‍यवान समजणे

या रथोत्‍सवाच्‍या वेळी मला गुरुमाऊलीला (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना) ओझरतेच बघता आले, तेव्‍हा क्षणभर मनात विचार आला, ‘गुरुमाऊलीला डोळे भरून बघायला मिळायला हवे होते’; पण त्‍या क्षणी गुरुदेवांच्‍या कृपेनेच मनात दुसरा विचार आला, ‘मला या अभूतपूर्व रथोत्‍सवात सहभागी होण्‍याची संधी मिळून गुरुदेवांचे दर्शन झाले’, हेच माझे पुष्‍कळ मोठे भाग्‍य आहे.’ त्‍या दिवशी रात्री झोपेतही मला गुरुमाऊलीचे सुंदर रूप दिसले. झोपेतही मला ‘मी रथोत्‍सवात चालत असून रथोत्‍सवात लावलेली धून म्‍हणत आहे आणि जयघोष करत आहे’, असे जाणवले.

‘गुरुमाऊलीनी मला रथोत्‍सवात सहभागी होण्‍याची संधी दिली आणि स्‍वप्‍नातही मला तो सोहळा अनुभवण्‍यास दिला’, यांसाठी मला त्‍यांच्‍याबद्दल कृतज्ञता वाटली. सनातनच्‍या तिन्‍ही गुरूंच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. सुचेता नाईक, गोवा. (२३.५.२०२२)