मंगलमय रथोत्सवाच्या वेळी कु. मानसी अग्निहोत्री यांना आलेल्या अनुभूती

कु. मानसी अग्निहोत्री

१. ‘रथोत्सवाच्या दिवशी वातावरण पुष्कळ प्रसन्न आणि आनंदी होते. ‘ते वातावरण अन्य दिवसांच्या वातावरणापेक्षा वेगळे आहे’, असे मला वाटले.

२. रथोत्सवात सहभागी होण्याच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले ज्या क्षणी खोलीतून बाहेर आले, त्या क्षणी जणूकाही आजूबाजूची झाडे, रोपे आणि फुले यांना ईश्वराच्या सगुण रूपाचे दर्शन होऊन ‘ती आनंदात डोलत आहेत’, असे मला वाटले.

३. रथोत्सवातील साधकांना पाहून माझी भावजागृती झाली.

४. रथोत्सवातील अनेक संत आणि साधक यांना शारीरिक त्रास असूनही ते अखंड अनवाणी चालत होते.

५. ‘संपूर्ण रथोत्सवाभोवती श्रीकृष्णाचे पिवळ्या रंगाचे संरक्षककवच असून ते साधकांचे रक्षण करत आहे’, असे मला जाणवले. त्यामुळे रथोत्सवामध्ये एकही अडथळा आला नाही.

गुरुदेवांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) शारीरिक स्थिती बरी नसूनही ते साधकांना आनंद देण्यासाठी रथोत्सवात सहभागी झाले आणि ‘हा रथोत्सव त्यांच्याच कृपेने पार पडला’, याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– कु. मानसी अग्निहोत्री, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.५.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक