सोलापूर – सध्या शहरातील कचरा संकलन करणार्या घंटागाड्यांचे नियोजन विस्कळीत झाले आहे. जुळे सोलापूरसह हद्दवाढ आणि शहरातील अनेक भागांत काही ठिकाणी २, तर काही ठिकाणी ४ दिवसांतून एकदा घंटागाडी येते. शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी २४० घंटागाड्यांची आवश्यकता आहे; मात्र केवळ १९० गाड्या उपलब्ध आहेत.
गाड्यांचा तुटवडा, गाड्यांची नादुरुस्ती, नियोजनातील त्रुटी यांमुळे घंटागाड्या नियमित आणि वेळेत पोचत नाहीत. त्यामुळे हद्दवाढ भागात नागरिकांना उघड्यावर कचरा टाकावा लागत आहे. सोसायट्यांमध्ये कचर्याच्या डब्यांत कचरा साचल्याने त्याची दुर्गंधी सोसायटीमध्ये पसरत आहे.
संपादकीय भूमिका‘अशा प्रकारे नियोजन करणारे प्रशासन काय कामाचे ?’, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? गाड्यांची उपलब्धता त्वरित न करणार्यांना कठोर शिक्षा केल्यासच अशा चुका परत होणार नाहीत ! |