व्यवस्थितपणा अंगी असलेली आणि भाव ठेवून प्रत्येक कृती करणारी ६३ टक्के आध्यात्मिक पातळीची फोंडा, गोवा येथील कु. पूर्ती अमेय लोटलीकर (वय १२ वर्षे) !           

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. पूर्ती अमेय लोटलीकर ही या पिढीतील एक आहे !

(वर्ष २०१६ मध्ये कु. पूर्ती अमेय लोटलीकर हिची आध्यात्मिक पातळी ६६ टक्के होती. – संकलक)

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कु. पूर्ती लोटलीकर

१. डोंबिवली, ठाणे येथून गोव्याला स्थलांतरित होतांना दोन्ही मुलींनी सकारात्मक राहून परिस्थिती स्वीकारणे आणि कु. पूर्तीने ‘गोवा माझी ‘गुरुभूमी’ आहे’, असे सांगणे

‘आतापर्यंत आम्ही डोंबिवली, ठाणे येथे रहात होतो. आता आम्ही डोंबिवलीहून गोव्याला स्थलांतर केले आहे. आमच्या दोन्ही मुली, कु. पूर्ती (वय १२ वर्षे) आणि कु. सान्वी (वय ७ वर्षे आणि २०२० ची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांच्यासाठी हा पालट मोठा होता. त्यांची शाळा, मित्रपरिवार, शिकवणी वर्ग, मनोरंजन आणि खेळण्याची ठिकाणे या सगळ्यांमध्ये आमूलाग्र पालट होणार होता. स्थलांतर करण्यापूर्वी आम्ही पूर्तीला याविषयी विचारले असता ती लगेच सिद्ध झाली आणि म्हणाली, ‘‘महाराष्ट्र माझी जन्मभूमी असली, तरी गोवा माझी ‘गुरुभूमी’ आहे. तिकडे स्थलांतर करण्यात मला काहीच अडचण वाटत नाही.’’ तिच्या बोलण्यामुळे आम्हाला पुष्कळ धीर आला. तिची लहान बहीण कु. सान्वी याविषयी सकारात्मक होतीच; पण पूर्तीच्या बोलण्याने तिलाही आणखी हुरूप आला. गोव्यात येण्यासाठी आणि आल्यानंतर आम्हाला असंख्य गोष्टींशी जमवून घ्यावे लागले; पण दोन्ही मुली मुळातच सात्त्विक असल्याने त्यांनी सर्व पालट सहजपणे स्वीकारले.

सौ. आर्या लोटलीकर

२. कोकणी भाषा शिकणे

गोव्यात आल्यावर पूर्तीला फार लवकर कोकणी भाषा समजू लागली. आता ती काही वाक्ये बोलूही लागली आहे.

३. व्यवस्थितपणा

पूर्तीला अव्यवस्थितपणा मुळीच आवडत नाही. तिचे कपाट कधीही पाहिले, तर ते नुकतेच आवरून ठेवल्यासारखे व्यवस्थित असते. त्यामुळे तिचे कपाट पाहिले की, आनंद होतो. तिला अशी सवय लावल्यामुळे ईश्वरचरणी माझी कृतज्ञता व्यक्त होते.

४. सतर्क

पूर्ती स्वतःचा आहार, व्यायाम आणि शरीरस्वास्थ्य यांविषयी सतर्क असते अन् ठरवलेले ध्येय पूर्ण होण्यासाठी तळमळीने प्रयत्न करते.

५. प्रतिदिन स्तोत्रपठण करणे

पूर्ती श्री गणपतिस्तोत्र, श्री मारुतिस्तोत्र, श्री रामरक्षा, श्री प्रज्ञावर्धनस्तोत्र, पसायदान इत्यादी सर्व प्रतिदिन म्हणते.

६. भाव ठेवून प्रत्येक कृती करणे

पूर्ती प्रत्येक कृतीला भाव जोडून सेवा करण्याचा प्रयत्न करते. तिच्या आजोबांनी घरी झाडे लावली आहेत. पूर्ती झाडांना पाणी घालतांना ‘ही झाडे प.पू. आबांनी (परात्पर गुरु डॉक्टरांनी) लावली आहेत’, असा भाव ठेवते.

७. स्वभावदोष

पूर्तीमध्ये ‘राग येणे’ हा स्वभावदोष तीव्र प्रमाणात आहे.

८. स्वभावदोष घालवण्यासाठी करत असलेले प्रयत्न

‘राग येणे’ हा स्वभावदोष घालवण्यासाठी पूर्ती ‘चुका लिहिणे, सारणी लिखाण करणे, स्वयंसूचनांचे सत्र करणे आणि प्रायश्चित्त घेणे’, असे प्रयत्न करते.

९. ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा जप करतांना पूर्तीला भुवयांच्या मध्यभागी फिकट पिवळा प्रकाश, त्याच्या बाजूला फिकट निळा आकाशी रंग आणि पिवळ्या प्रकाशात ‘ॐ’ हे अक्षर दिसणे

‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप करत असतांना पूर्तीला आरंभी दोन्ही भुवयांच्या मध्यभागी फिकट पिवळा प्रकाश दिसला. नंतर त्याच्या बाजूला फिकट निळा आकाशी रंग दिसला आणि थोड्या वेळाने पिवळ्या प्रकाशात ‘ॐ’ हे अक्षर दिसले. दोन्ही भुवयांच्या मध्ये पांढरा, पिवळा आणि नारिंगी असे एकत्रित रंग दिसले.

नामजप करतांना ‘श्री’ आणि ‘निर्विचार’ ही दोन वेगवेगळी तत्त्वे आहेत’, असे तिला वाटत होते. तिला ‘श्री’चा प्रकाश पिवळा आणि ‘निर्विचार’चा प्रकाश पांढरा दिसला. या वेळी पूर्तीने मनातील विचारांकडे लक्ष दिल्यावर ‘तिच्या मनात विचार नव्हते’, असे तिच्या लक्षात आले.’

– सौ. आर्या अमेय लोटलीकर (कु. पूर्तीची आई), ढवळी, फोंडा, गोवा. (१९.५.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.