
यादगिरी (कर्नाटक) – येथील ‘रॉयल गार्डन’ या उपाहारगृहात रात्री मित्रांसमवेत जेवायला गेलेल्या श्रीनिवास या भाजप कार्यकर्त्याची उपाहारगृहातील मुसलमान कर्मचारी आणि अन्य काही जण यांनी मिळून निर्घृण हत्या केली. श्रीनिवास येथे भांडण सोडवण्यासाठी गेला असता त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध करत भाजप आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे कार्यकर्ते यांनी निदर्शने केली.
रॉयल गार्डन उपाहारगृहाचे मालक आणि श्रीनिवास जेवण आटोपून परतत असतांना उभी केलेली गाडी काढण्यावरून त्याच्या मित्रांमध्ये भांडण चालू झाले. श्रीनिवास हा गोंधळ बघून भांडण सोडवायला गेले. या वेळी उपाहारगृहामध्ये काम करणारा महंमद अनस आणि अन्य ४-५ जण यांनी अचानक येऊन श्रीनिवास यांच्या पोटात चाकूने वार केले. श्रीनिवास खाली कोसळून जागीच मरण पावला. पोलिसांनी या हत्येच्या प्रकरणी ६ जणांना अटक केली आहे.
संपादकीय भूमिकाकर्नाटकमध्ये भाजपचे राज्य असो कि काँग्रेसचे, हिंदु कार्यकर्त्यांच्या हत्या थांबलेल्या नाहीत. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते ! |
इचलकरंजीला (जिल्हा कोल्हापूर) शाश्वत पाणीपुरवठ्याच्या संदर्भात लवकरच निर्णय घोषित करण्यात येणार ! – मुख्यमंत्री
‘शासकीय महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थे’तील शिक्षिका आणि प्राचार्य यांच्या चौकशीची मागणी !
Provident Fund : केंद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजाला संमती
सांगली येथील ‘दावल मलिक दर्गा’ पाडून अवैध मदरसा तात्काळ भुईसपाट करा !
उत्तरप्रदेशात ४ महिन्यांत दलितांवर अत्याचार करण्यात मुसलमानही अग्रेसर