आयुर्वेदाच्या दृष्टीनेही गंगाजलात रोग निवारण करण्याची अद्भुत क्षमता आहे. रुडकी विश्वविद्यालयामध्ये काही वर्षांपूर्वी गंगाजलावर काही संशोधन केले होते, ज्यावरून असा निष्कर्ष काढला होता की, गंगाजलामध्ये रोगाचे सूक्ष्मजंतू (बॅक्टेरिया) नष्ट करण्याची शक्ती अन्य जलस्रोतांपेक्षा अधिक आहे. गंगाजलामध्ये जंतूभक्षक ‘बॅक्टीरियोफाज’ हा घटक अधिक प्रमाणात आढळतो. ते बॅक्टेरियाला खाऊन टाकत असल्यामुळे गंगाजल शुद्ध होते आणि गंगाजलामध्ये रोगाचे सूक्ष्मजंतू जिवंतच राहू शकत नाहीत.’
(साभार : मासिक ‘कल्याण’, सप्टेंबर २००३)