६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विनायक शानभाग यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

 श्री. विनायक शानभाग हे सनातन संस्थेला मिळालेले अनमोल रत्न आहेत. त्यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.  

१. श्री. विनायक शानभाग यांनी मागील जन्मात श्री गणेश आणि श्रीविष्णु यांची उपासना केलेली असणे

श्री. विनायक शानभाग

१ अ. विनायकदादांनी मागील ५ जन्मांपासून श्रीगणेशाची आराधना केलेली असणे : विनायकदादा हे मूळ महर्लोकातील निवासी असून ते मागील ५ जन्मांपासून श्री गणेशाची आराधना करत आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये ७ टक्के गणेशतत्त्व कार्यरत झालेले आहे. श्री गणेशाच्या उपासनेमुळे त्यांची बुद्धी पुष्कळ प्रमाणात सात्त्विक झालेली आहे. त्यामुळे त्यांना धर्म आणि अध्यात्म यांच्या सूक्ष्म पैलूंचे आंतरिक ज्ञान आहे. श्री गणेशाच्या कृपेमुळे त्यांच्या बुद्धीला दैवी सूत्रांचे आकलन चटकन होते आणि त्यांची स्मरणशक्ती चांगली आहे. त्यामुळे दैवी शक्तींनी सांगितलेली सूत्रे त्यांना चांगल्या प्रकारे स्मरणात रहातात.

१ आ. श्री. विनायकदादांनी मागील ३ जन्मांपासून श्रीविष्णूचीही उपासना केलेली असणे : विनायकदादांनी मागील ३ जन्मांपासून श्री गणेशासह श्रीविष्णूचीही उपासना भावपूर्ण केल्यामुळे त्यांना आता श्रीविष्णुस्वरूप असणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यात सहभागी होण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. त्यामुळे महर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू भारत आणि विदेश येथे करत असलेल्या दैवी दौर्‍यांवर त्यांच्या समवेत जाण्याची, तसेच नाडीपट्टीतील सूत्रांचे भाषांतर करण्याची सेवा विनायकदादा यांना मिळालेली आहे.

१ इ. श्री. विनायकदादांवर श्री गणेश आणि श्रीविष्णु या दोन्ही देवांची कृपा असल्यामुळे त्यांची व्यष्टी अन् समष्टी साधना चांगल्या प्रकारे होणे : श्री गणेशाच्या उपासनेमुळे विनायकदादांची व्यष्टी साधना होऊन त्यांचा पिंड सात्त्विक आणि चैतन्यदायी बनलेला आहे. श्रीविष्णूच्या कृपेमुळे विनायकदादांची समष्टी साधना होऊन त्यांचा पिंड व्यापक होत आहे. अशा प्रकारे श्री गणेश आणि श्रीविष्णु यांची उपासना पूर्ण झाल्यामुळे त्यांची व्यष्टी अन् समष्टी साधना चांगल्या प्रकारे होऊन त्यांची आध्यात्मिक उन्नती होत आहे.

२. श्री. विनायकदादांवर पार्वतीस्वरूप असणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळकाकू यांची कृपादृष्टी पडल्यामुळे त्यांच्यातील सुप्त आध्यात्मिक क्षमता जागृत झालेली असणे

कु. मधुरा भोसले

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळकाकू करत असलेल्या दैवी दौर्‍यांवर त्यांच्या समवेत जाण्याचा योग विनायकदादांना आलेला आहे. त्यांच्यावर पार्वतीस्वरूप असणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांची कृपादृष्टी पडल्यामुळे त्यांच्यातील सुप्त आध्यात्मिक क्षमता जागृत झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या सूक्ष्म देहांमध्ये श्री गणेश आणि श्रीविष्णु यांचे संमिश्र तत्त्व ‘पूर्णानंद’ या नावाने कार्यरत झाले आहे. त्यामुळे त्यांच्या जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये नक्षत्रलोकात वास करणारे सप्तर्षी आणि महर्लोक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक येथील महर्षि, देवर्षि आणि ब्रह्मर्षि यांच्याशी सूक्ष्मातून संवाद चालू असतो. हा संवाद प्रकाश भाषेमध्ये असल्यामुळे विनायकदादांना शब्दांच्या स्तरावरील विचारांच्या रूपाने अल्प प्रमाणात; परंतु शब्दातीत आनंदाच्या अनुभूतीच्या स्वरूपात अधिक प्रमाणात दैवी ज्ञान मिळते. हे ज्ञान समष्टीसाठी अत्यंत उपयुक्त असते. त्यांना सूक्ष्मातून श्री गणेश, शिव, पार्वती, शेषनाग, गरुड आणि हनुमान यांचेही दर्शन झालेले आहे.

विविध लोकांत निवास करणारे ऋषि आणि त्यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये  

–  कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१.२०२२) (क्रमश:)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक