परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ वा जन्मोत्सवाचा सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना विविध जिल्ह्यांतील जिज्ञासू, धर्मप्रेमी आणि साधक यांना आलेल्या अनुभूती !

१. सौ. तेजश्री खवाटे (‘साधना सत्संगा’तील जिज्ञासू ), गावभाग, सांगली.

अ. ‘सोहळा पहातांना घरात पुष्कळ शांतता जाणवत होती.

आ. कार्यक्रमाच्या शेवटी ‘घरात पिवळा प्रकाश पडला आहे’, असे मला जाणवले.’

२. श्री. अरुण महाजन (धर्मप्रेमी), बाराहळ्ळी, मुखेड, जिल्हा नांदेड.

अ. ‘सोहळा पहातांना माझ्या समवेत माझे दोन नातू होते. त्यांतील ६ वर्षांचा एक नातू प्रभु श्रीरामाच्या वेशभूषेतील श्री गुरूंना पाहून म्हणत होता, ‘‘गुरुदेव देवबाप्पा आहेत.’’

आ. मला ‘हा सोहळा दैवी लोकात होत आहे’, असे वाटत होते. सोहळा पहातांना मला ‘रामराज्य’, म्हणजे ‘हिंदु राष्ट्र’ येणार आहे’, याची निश्चिती वाटली.

इ. ‘हिंदु राष्ट्रातही आम्हाला गुरुदेवांचे मार्गदर्शन लाभणार आहे’, असे मला वाटले. ‘गुरुदेवांना दीर्घायुष्य लाभो’, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.’

३. श्री. गजानन अन्नुरे (धर्मप्रेमी), गावभाग, सांगली.

अ. ‘सोहळा पाहिल्यावर मला जीवनातील श्री गुरूंचे महत्त्व समजले.’

४. श्री. विशाल ठोके (धर्मप्रेमी), कुंडल, जिल्हा सांगली. 

अ. ‘सोहळा पहातांना माझा भाव सतत जागृत होत होता.

आ. सोहळा पहातांना माहितीजालाची (‘इंटरनेट’ची) अडचण येत होती; पण वायुदेवतेला प्रार्थना केल्यानंतर अडचण दूर होत होती.’

५. एक धर्मप्रेमी

अ. ‘सोहळा पहातांना मला स्वतःचा आणि आसपासच्या वातावरणाचा पूर्णपणे विसर पडला होता.

आ. ‘श्री गुरूंच्या समोर मीच उभा आहे आणि मीच त्यांची आरती, पूजन आणि नृत्य करत आहे’, असे मला जाणवले.

इ. ‘सोहळा कधी संपला ?’, हे मला कळलेच नाही.’

६. श्री प्रवीण गिरी (धर्मप्रेमी), मुरुड, जिल्हा लातूर.

अ. ‘सोहळा पाहून मला पुष्कळ प्रसन्न वाटले.

आ. मला सर्वत्र श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वेशभूषेतील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारी रूप दिसत होते आणि ‘ते माझ्याकडे पहात आहेत’, असे मला जाणवले.

इ. माझ्या शरिरात पुष्कळ ऊर्जा संचारली. ‘मी कृतार्थ झालो’, असे मला वाटले.’

७. सौ. रश्मी चिम्मलगी, कोइम्बतूर, तमिळनाडू.

१. ‘सोहळा चालू होताक्षणी माझे मन स्थिर झाले.

२. मला माझ्या अनाहतचक्राच्या ठिकाणी थंडावा जाणवला. तेव्हा ‘मी दैवी लोकात आहे’, असे मला वाटत होते.

३. नामजप करण्यासाठी मला नवी ऊर्जा मिळाली.’

(समाप्त) (सर्व सूत्रांचा दिनांक मे २०२१)