परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ जन्मोत्सवाचा  सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना विविध जिल्ह्यांतील जिज्ञासू, धर्मप्रेमी आणि वाचक यांना आलेल्या अनुभूती !

१. कोल्हापूर

परात्पर गुरु डॉ. आठवले

१ अ. श्री. चंद्रकांत पवार (‘साधना सत्संगा’तील जिज्ञासू), कोल्हापूर

१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव सोहळा पहातच रहावा आणि त्यांचे रूप डोळ्यांत भरून घ्यावे. ‘हिंदु राष्ट्र’च श्री गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) भेटीला येत आहे’, असे मला वाटत होते.

२. ‘श्री गुरूंनी माझ्यासारख्या बालकाला मायारूपी वादळातून हाताला धरून बाहेर काढले आणि योग्य वाट दाखवून माझ्यावर उपकार केले’, याची जाणीव होऊन मला संतांचे पुढील अभंग आठवले.

झाले समाधान तुमचे देखिले चरण ।
करा क्षमा अपराध गुरुदेव तुम्ही सिद्ध ।। – संत तुकाराम महाराज

करूनी आरती आता ओवाळू श्रीपति ।
आजि पुरले नवस धन्य जाला हा दिवस ।। – संत तुकाराम महाराज

धन्य धन्य हे लोचन नित्य करिती अवलोकन । – संत नामदेव महाराज

आता उठावेसे मना येत नाही नारायणा ।। – संत तुकाराम महाराज

१ आ. श्री गणेश कार्वेकर (‘साधना सत्संगा’तील जिज्ञासू), राजारामपुरी, कोल्हापूर.

१. सोहळा पहातांना माझी भावजागृती होत होती.

२. रामनाथी आश्रम हा पृथ्वीवरील स्वर्गलोक आहे आणि स्वर्गलोकातील श्रीविष्णूचे रूप मी डोळे भरून पहात आहे, असे मला जाणवत होते.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले प्रभु श्रीरामाच्या रूपात सिंहासनावर विराजमान झाल्यावर ‘हिंदु राष्ट्र लवकरच स्थापन होणार आहे’, असे मला जाणवले.

१ इ. सौ. मनीषा लळीत (दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचिका), कोल्हापूर

१. ‘सोहळा चालू होताच माझा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’, हा नामजप चालू झाला.

२. सोहळ्याच्या वेळी घराबाहेर असलेल्या झाडावर बसलेल्या भारद्वाज पक्ष्याचा आवाज मला बराच वेळ ऐकू येत होता. हा शुभसंकेत माझ्या मनाला पुष्कळ आनंद देऊन गेला.

३. ‘ॐ जय जगदीश हरे…’ ही आरती चालू असतांना बाहेर चालू असणार्‍या पावसाचे तुषार माझ्या अंगावर उडाले आणि माझ्या मनामध्ये सुंदर भाव निर्माण झाले. ते मी शब्दांमध्ये वर्णन करू शकत नाही. तेव्हा ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना लवकरच होणार आहे’, असा शुभसंकेत गुरुदेवांकडून मिळाला’, असे मला वाटले.’

१ ई. श्री. आनंद माने (‘सनातन प्रभात’चे वाचक), राजारामपुरी, कोल्हापूर.

१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गोड स्मितहास्य पाहून मला पुष्कळ आनंद जाणवत होता.

२. विष्णुलोकातील (रामनाथी आश्रमातील) दीपोत्सव आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीसत्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याकडे पाहून माझी पुष्कळ भावजागृती होत होती.’

१ उ. सौ. सायली कुलकर्णी (‘सनातन प्रभात’च्या वाचिका), राजारामपुरी, कोल्हापूर.

१. ‘सोहळा पहातांना माझ्या शरिरातून काहीतरी बाहेर पडत आहे’, असे मला जाणवत होते.

२. आरती चालू असतांना माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते.

३. ‘माझ्या हृदयात लख्ख प्रकाश पडला आहे’, असे वाटून माझे मन शांत आणि स्थिर झाले होते.

४. सोहळा चालू असतांना माझा ‘श्री विष्णवे नमः ।’, हा नामजप आपोआप चालू झाला.

५. श्री गुरूंना श्रीरामाच्या वेशभूषेत पाहिल्यावर माझा ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’, हा नामजप चालू झाला.

६. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याकडून येणार्‍या प्रकाशाचा एक त्रिकोण सिद्ध होऊन त्यातून सर्वत्र पिवळा प्रकाश पसरत आहे’, असे मला दिसले.’

१ ऊ. श्री. बाजीराव शिंदे (धर्मप्रेमी), गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर.

१. ‘श्रीरामाच्या वेशभूषेतील गुरुदेवांचे दर्शन झाल्यावर माझे मन प्रसन्न झाले.

२. या कालावधीत २ वेळा माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.

३. सोहळा पहातांना ‘मी रामनाथी आश्रमात आहे’, असे मला वाटले.’

१ ए. सौ. मीरा करपे (धर्मप्रेमी), शिरोली, जिल्हा कोल्हापूर.

१. ‘सोहळा पहातांना ‘माझ्याभोवतालचे त्रासदायक शक्तींचे आवरण नष्ट होत आहे’, असे मला वाटत होते.

२. मला सोहळ्यात पुष्कळ चैतन्य जाणवले.

३. ‘श्री गुरूंच्या कृपेने हा सोहळा आम्ही स्वर्गलोकात बसून पहात आहोत’, असे मला जाणवले.’

(क्रमशः)

(सर्व सूत्रांचा मास : मे २०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक