प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या नाशिक येथील भक्तांनी प.पू. डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

‘मार्च २०२३ मध्ये प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचे काही भक्त रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पहायला आले होते. तेव्हा त्यांनी प.पू. डॉ. आठवले यांच्याविषयी पुढील सूत्रे सांगितली.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. प.पू. डॉ. आठवले यांनी गुरूंच्या कार्याचा मोठा वृक्ष निर्माण करणे

पूर्वी आमचे आणि प.पू. डॉ. आठवले यांचे अगदी मित्रासारखे संबध होते. तेव्हा आम्हाला ‘पुढे प.पू. डॉक्टरांच्या हातून प.पू. बाबांचे एवढे मोठे कार्य होणार आहे’, असे स्वप्नातही वाटले नव्हते. आता रामनाथी आश्रम पाहिल्यावर लक्षात येते की, त्यांनी कार्याचा मोठा वटवृक्ष निर्माण केला आहे.’

२. प.पू. डॉ. आठवले यांच्या बोलण्याचा भावार्थ आता लक्षात येणे

प.पू. बाबा रुग्णाईत असतांना त्यांना कांदळीला आणले होते. तेव्हा आम्ही त्यांच्या खोलीत बसलो होतो. प.पू. डॉक्टर आम्हाला म्हणाले, ‘‘प.पू. बाबांचे वय झाले आहे. असे होणारच आहे.’’ तेव्हा आम्ही त्यांच्यावर चिडलो; परंतु आता लक्षात येते की, ‘प.पू.डॉक्टर आमच्या मनाची सिद्धता करून घेत होते.’

संग्राहक : सौ. वृंदा मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(९.३.२०२३)