समाजातील विवेकशून्य मानसिकतेचे प्रतीक !

बस थांब्याच्या समोरच वाहने उभी केलेली दिसत आहेत

या छायाचित्रात आपल्याला रस्त्याच्या बाजूला असलेला बस थांबा (बस स्टॉप) आणि काही वाहने उभी केलेली दिसत आहेत. एका रुणालयाच्या बाजूला हा बस थांबा आहे. सरकारने पूर्णपणे स्टेनलेस स्टीलचा बस थांबा बांधला आहे. बसच्या प्रतीक्षेत असणार्‍यांना या ठिकाणी बसता यावे, यासाठीही चांगली बैठक व्यवस्था आहे.

परंतु…

बस थांब्याच्या बाजूला असलेल्या रुग्णालयाचे कर्मचारी आणि रुग्णाला स्वतःच्या वाहनाने रुग्णालयात घेऊन येणारे रुग्णांचे नातेवाईक यांनी बस थांब्याच्या समोरच त्यांची वाहने उभी केलेली आपल्याला छायाचित्रात दिसत आहेत. बस थांब्यासमोरच वाहने उभी केल्यामुळे बस थांब्याचा वापर करणे अशक्य झाले असून बसने येणारे रुग्ण किंवा परिसरातील इतर प्रवासी यांना भर उन्हात रस्त्यावर उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे हा पूर्णपणे स्टेनलेस स्टीलचा बस थांबा असूनही नसल्यासारखा आहे. समाजात स्वार्थापोटी निर्माण झालेली ही विवेकशून्य मानसिकता आपल्याला इतर ठिकाणीही पहायला मिळते.