तुर्कीये येथे आंतरराष्ट्रीय परिषदेत रशियाच्या प्रतिनिधीला युक्रेनच्या प्रतिनिधीने चोपले !

युक्रेनचा राष्ट्रध्वज काढल्याने केली मारहाण !

अंकारा (तुर्कीये) – येथे आयोजित ‘ब्लॅक सी इकॉनॉमिक कोऑपरेशन’च्या एका महत्त्वाच्या बैठकीच्या वेळी रशिया आणि युक्रेन यांच्या प्रतिनिधींमध्ये हाणामारी झाली. युक्रेनच्या प्रतिनिधीने रशियाच्या प्रतिनिधीला ५-६ ठोसे मारले.

या बैठकीला उपस्थित सदस्यांचे छायाचित्र काढण्यात येत असतांना युक्रेनचे खासदार अलेक्झांडर मारिकोव्स्की त्यांच्या देशाचा राष्ट्रध्वज घेऊन उभे होते. त्या वेळी रशियाच्या प्रतिनिधीने अचानक त्यांच्या हातातून ध्वज हिसकावून घेऊन फेकून दिला. त्यानंतर ते तसेच पुढे निघून गेले. त्यांच्या या कृतीमुळे युक्रेनचे खासदार मारिकोव्स्की  संतापले. त्यांनी रशियाच्या प्रतिनिधीचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली.