अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर श्री महालक्ष्मीदेवीला हापूस आंब्यांची आरास !

कोल्हापूर – अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर कोल्हापूर येथील साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीला हापूस आंब्यांची आरास करण्यात आली होती. याच समवेत चैत्र हिंडोळा रूपातील श्री महालक्ष्मीदेवीची विशेष पूजाही बांधण्यात आली होती.

चैत्र हिंडोळा रूपातील श्री महालक्ष्मीदेवीची केलेली पूजा