मोगलांचे धडे हटवलेले नाहीत ! – एन्.सी.ई.आर्.टी. प्रमुख

‘एन्.सी.ई.आर्.टी.’चे प्रमुख दिनेश प्रसाद सकलानी (डावीकडे)

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (एन्.सी.ई.आर्.टी.ने) इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या उत्तरप्रदेशच्या पाठ्यपुस्तकांमधून मोगलांचा इतिहास सांगणारे धडे वगळण्याचा निर्णय घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. यानंतर ‘एन्.सी.ई.आर्.टी.’चे प्रमुख दिनेश प्रसाद सकलानी यांनी स्पष्टीकरण जारी केले आहे. पाठ्यपुस्तकांमधून मोगलांचे धडे हटवले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘गेल्या वर्षी कोरोनामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे ओझे अधिक होते, ते आम्ही अल्प केले होते’, असे सकलानी यांनी सांगितले.

‘एन्.सी.ई.आर्.टी.’चे प्रमुख पुढे म्हणाले की, ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२०’ नुसार शालेय शिक्षणासाठी ‘नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क’ सिद्ध केले जात आहे. नवीन धोरणानुसार २०२४ मध्ये पाठ्यपुस्तके छापली जातील.