सप्तदेवतांच्या मराठी भाषेतील देवनागरी लिपीतील नावांतून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘हिंदु धर्मात अनेक देवीदेवता आहेत, उदा. सप्तदेवता (शिव, श्रीराम, श्रीकृष्ण, मारुति, दत्त, श्री गणपति आणि श्री दुर्गादेवी या सप्तदेवतांना ‘उच्च देवता’, असे म्हणतात. त्यांची उपासना केली जाते.) स्थानदेवता, ग्रामदेवता आदी. सप्तदेवतांची मराठी भाषेतील (देवनागरी लिपीतील) नावे आणि इंग्रजी भाषेतील (रोमन लिपीतील) नावे यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे संशोधन करण्यात आले. ते पुढे दिले आहे.

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत शिव, श्रीराम, श्रीकृष्ण, मारुति, दत्त, श्री गणपति आणि श्री दुर्गादेवी या सप्तदेवतांची मराठी भाषेतील (देवनागरी लिपीतील) नावे आणि इंग्रजी भाषेतील (रोमन लिपीतील) नावे यांच्या कोर्‍या कागदांवर प्रिंट काढून त्यांच्या ‘यू.ए.एस्. (युनिर्व्हसल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या.

१ अ. सप्तदेवतांच्या मराठी भाषेतील देवनागरी लिपीतील नावांत नकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असणे

१ आ. सप्तदेवतांच्या इंग्रजी भाषेतील रोमन लिपीतील नावांत सकारात्मक ऊर्जेसह नकारात्मक ऊर्जाही आढळणे

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

सौ. मधुरा कर्वे

२ अ. सप्तदेवतांच्या मराठी भाषेतील देवनागरी लिपीतील नावांतून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्याचे कारण : ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती (स्पंदने) एकत्र असतात’, हे अध्यात्मातील तत्त्व आहे. यानुसार जेथे देवतेचे नाव आहे, तेथे तिची स्पंदने असतात. मराठी भाषेतील शब्द उच्चारानुसार लिहिण्यात येतात. देववाणी संस्कृतच्या खालोखाल मराठी सर्वाधिक सात्त्विक भाषा आहे. मराठी भाषेतील अक्षरांमध्ये सत्त्वगुण प्रधान अक्षरांचे प्रमाण अधिक असल्याने त्या अक्षरांतून सकारात्मक (सात्त्विक) स्पंदने प्रक्षेपित होतात. यांमुळे मराठी भाषेतील देवनागरी लिपीतील सप्तदेवतांच्या नावांतून त्या त्या देवतेचे तत्त्व (चैतन्य) पुष्कळ प्रमाणात प्रक्षेपित झाले.

२ आ. सप्तदेवतांच्या इंग्रजी भाषेतील रोमन लिपीतील नावांतून सकारात्मक स्पंदनांसह त्रासदायक (नकारात्मक) स्पंदनेही प्रक्षेपित होण्याचे कारण : इंग्रजी भाषेतील शब्द (स्पेलिंग) उच्चारानुसार लिहिले जातात असे नाही, तर बर्‍याचदा त्यामध्ये विसंगती आढळते. इंग्रजी भाषेतील अधिकतर अक्षरे तमप्रधान आहेत. त्यामुळे त्यांतून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होतात. जेथे देवतेचे नाव आहे, तेथे तिची स्पंदने असतात. त्यामुळे सप्तदेवतांच्या इंग्रजी भाषेतील नावांतून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली; पण मराठीच्या तुलनेत तिचे प्रमाण खूप अल्प आहे. इंग्रजी भाषा आणि तिची लिपी या तमप्रधान असल्यामुळे या नावांतून त्रासदायक (नकारात्मक) स्पंदनेही प्रक्षेपित झाली.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१३.३.२०२३)

ई-मेल : [email protected]

कोणत्याही उपचारपद्धतीत आध्यात्मिक साधनांचा वापर करणे, हे मानवाच्या कल्याणासाठी महत्त्वाचे आहे !