शस्त्रधारी मुसलमान मुलांच्या व्हिडिओ संदेशातून गीर्ट विल्डर्स यांना मारण्याची धमकी !

नेदरलँड्स येथील खासदार गीर्ट विल्डर्स

अ‍ॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) – हातात धारदार तलवारी असलेली २ मुसलमान मुले ‘वाईट लोकांचे शिर धडावेगळे करण्याची एकमेव शिक्षा पैगंबर यांनी दिलेली आहे’, अशा प्रकारे अरबी भाषेत जोरजोरात ओरडत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. पाकिस्तानच्या लाहोर येथील डॉ. फातिमा या महिलेने नेदरलँड्सचे प्रखर इस्लामविरोधी खासदार गीर्ट विल्डर्स यांना उद्देशून हा व्हिडिओ ट्वीट केला आहे. या माध्यमातून फातिमा यांनी विल्डर्स यांना चेतावणीच दिल्याचे सांगितले जात आहे. विल्डर्स यांनी या ट्वीटवर ‘यापेक्षा अधिक वाईट काय असू शकेल ?’ अशा प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

संपादकीय भूमिका

इस्लामच्या विरोधात कुणी बोलले अथवा लिहिले किंवा चिकित्सा करण्याची मागणी केली, तर संंबंधितांच्या विरोधात फतवे निघतात किंवा त्यांना ठार मारले जाते. विल्डर्स यांच्या संदर्भातही हेच घडत आहे !