पुणे येथे निवृत्त साहाय्‍यक पोलीस आयुक्‍तांची ६६ लाख रुपयांची फसवणूक !

पुणे – भोर तालुक्‍यात स्‍वस्‍तात शेतभूमी विकत देण्‍याच्‍या आमिषाने सेवानिवृत्त साहाय्‍यक पोलीस आयुक्‍त या अधिकार्‍याची ६० लाख रुपयांची फसवणूक केल्‍याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी राजेश पोटे, संदेश पोटे, प्रियंका सूर्यवंशी यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. या प्रकरणी एका सेवानिवृत्त पोलीस अधिकार्‍याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्‍यात तक्रार प्रविष्‍ट केली आहे.

‘अल्‍प किंमतीत शेतभूमी देतो’, असे सांगून आरोपींनी तक्रारदाराकडून ६० लाख रुपये घेतले; परंतु त्‍यांना शेतभूमी दिली नाही. त्‍यामुळे तक्रारदाराने आरोपींना जाब विचारून पैसे परत करण्‍याची मागणी केली. त्‍यानंतर आरोपींनी पुन्‍हा तक्रारदारास धमकावून ६ लाख रुपये उकळले. त्‍यानंतरही धमकावण्‍याचे प्रकार चालू होते. शेवटी तक्रारदाराने पोलीस ठाण्‍यात तक्रार प्रविष्‍ट केली.

संपादकीय भूमिका

पोलिसांचीच फसवणूक केली जाणे म्‍हणजे कायदा-सुव्‍यवस्‍थेचा धाक संपल्‍याचेच लक्षण !