कर्नाटकामधील भाजप सरकारने रहित केले ओबीसी मुसलमानांचे ४ टक्के आरक्षण !

मुख्यमंत्री बसवराज बोम्माई

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकमधील भाजप सरकारने ओबीसी मुसलमानांसाठी असलेले ४ टक्के आरक्षण रहित केले आहे. तसेच आता हे आरक्षण वोक्कलिगा आणि लिंगायत या दोन समुदायांमध्ये विभागण्यात आले आहे. यामुळे वोक्कालिगाचा कोटा ५ टक्क्यांवरून ७ टक्के करण्यात आला आहे. तसेच पंचमसाली, वीरशैव आणि इतर लिंगायत प्रवर्गासाठीचा कोटाही ५ टक्क्यांवरून ७ टक्के करण्यात आला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी याविषयी माहिती दिली.

ज्या मुसलमानांना आतापर्यंत ओबीसी कोट्यात आरक्षण मिळाले होते त्यांना आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागात ठेवण्यात आले आहे. १० टक्के दुर्बल विभागातील कोट्यासाठी ब्राह्मण, वैश्य, मुदलियार, जैन आणि इतर समुदायांसमसेत मुसलमानांना आता रहावे लागणार आहे.

संपादकीय भूमिका

जर अन्य राज्यांत असे आरक्षण देण्यात येत असेल, तर तेही रहित होणे आवश्यक !