‘लव्ह जिहाद’विरोधात हिंदूंनी जागृत होण्याची आवश्यकता ! – सौ. राजश्री तिवारी, रणरागिणी शाखा

महागाव (जिल्हा कोल्हापूर) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी १ सहस्रहून अधिक हिंदूंची उपस्थिती !

महागाव येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत मार्गदर्शन करतांना सौ. राजश्री तिवारी

महागाव (जिल्हा कोल्हापूर) – ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करणे; ‘हिंदु’ असल्याचे भासवून खोटे नाव सांगत मुलींची फसवणूक करणे; त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवून किंवा बलात्कार करून त्यांना ब्लॅकमेल करणे यांहूनही भयानक प्रकार उघडकीस येत आहेत. ‘धर्मशिक्षणाचा अभाव’ आणि ‘हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व न समजणे’, यांमुळे हिंदु मुली धर्मांतरीत होतात. त्यामुळे हिंदु युवतींनी लहानपणापासून धर्मशिक्षण घेणे अत्यावश्यक आहे. हिंदु भगिनींनो, ‘लव्ह जिहाद’ हा हिंदु मुलींच्या भावनांशी केलेला खेळ असून ते धर्म-परंपरा यांवरील संकट आहे. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’चे भीषण परिणाम टाळण्यासाठी हिंदूंनी जागृत होण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री तिवारी यांनी केले. त्या २२ मार्चला शिवाजी चौक येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होत्या.

या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सभेसाठी १ सहस्रहून अधिक हिंदू उपस्थित होते.

महागाव येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी उपस्थित हिंदु धर्माभिमानी

क्षणचित्रे

१. गुढीपाडव्याला सकाळी महागाव येथे सामूहिक गुढी उभारण्यात आली, तसेच संपूर्ण महागाव येथे बहुतांश हिंदूंनी भगव्या रंगाच्या गुढ्या उभारल्या होत्या.

२. शोभायात्रेच्या मार्गावर सर्वत्र भगवे ध्वज लावले होते. त्यामुळे सर्व वातावरण भगवेमय झाले होते.

३. शोभयात्रेचा प्रारंभ सायंकाळी ६ वाजता पाचरस्ता येथून झाला. शोभयात्रेत देण्यात आलेल्या ‘हर हर महादेव’, ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

विशेष

शोभयात्रा आणि सभेचे आयोजन करणार्‍या महागावमधील हिंदु आयोजकांनी आपापसातील मतभेद, गट आणि तट पूर्णपणे बाजूला ठेवून केवळ हिंदु म्हणून एकत्र येऊन या सभेचे आयोजन केले.