सद़्‍गुरु सत्‍यवान कदम यांची दैनंदिन वापरातील ‘हँडबॅग’ सांभाळतांना मन एकाग्र होऊन नामजप चालू होणे

डॉ.  रविकांत नारकर

१. सद़्‍गुरु सत्‍यवानदादा साधकासह सामान घेऊन दुचाकीवरून कुडाळ सेवाकेंद्रात जाणार असणे आणि त्‍या वेळी पावसाळी वातावरण असल्‍याने ‘सद़्‍गुरु दादा प्रवास कसा करतील ?’, या विचाराने मन अस्‍वस्‍थ होणे

‘श्री गणेशचतुर्थीच्‍या कालावधीत मी आणि सहसाधक श्री. अशोक करंगुटकर दुचाकीवरून सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील आरे या गावी (सद़्‍गुरु सत्‍यवान कदम यांच्‍या मूळ गावी) सद़्‍गुरु दादांच्‍या घरी श्री गणेशाचे दर्शन घ्‍यायला गेलो होतो. घरून निघण्‍याच्‍या वेळी सद़्‍गुरु सत्‍यवानदादा (सद़्‍गुरु सत्‍यवान कदम) म्‍हणाले, ‘‘मी आता श्री. प्रकाश मालोंडकर यांच्‍या समवेत दुचाकीवरून कुडाळ सेवाकेंद्रात जात आहे. माझ्‍या जवळ दोन मोठ्या ‘बॅग्‍ज’ आणि एक ‘हँडबॅग’, असे साहित्‍य आहे.’’ त्‍या वेळी पावसाळी वातावरण होते. तेव्‍हा ‘ते दुचाकीवरून प्रवास कसा करतील ?’, या विचाराने माझे मन अस्‍वस्‍थ झाले होते. त्‍यामुळे मी ‘सद़्‍गुरु दादांसाठी काही वेगळेनियोजन करू शकतो का ?’, असा विचार करत होतो. नंतर मी ‘गुरुदेवांना प्रार्थना केली.

२. तळमळीने केलेली प्रार्थना परात्‍परगुरु डॉक्‍टरांच्‍या चरणी पोचणे आणि पुढील नियोजन गुरुदेवांनीच करून घेेणे

त्‍याच वेळी मला माझ्‍या चालकाचा निरोप आला, ‘दुरुस्‍तीला दिलेली चारचाकी गाडी घेऊन कणकवलीहून निघालो आहे.’ तेव्‍हा मी त्‍याला ‘आरे तिठा’ (सद़्‍गुरु दादांच्‍या घरापासून ७ कि.मी. अंतरावर आहेे.) येथे थांब. आम्‍ही तेथे येत आहोत’, असा निरोप दिला. त्‍यानंतर मी ‘आरे तिठ्यावरून सहसाधक श्री. अशोक करंगुटकर चारचाकी गाडीने सद़्‍गुरु दादांना कुडाळला सोडून येतील’, असे नियोजन केले.

३. सद़्‍गुरु दादांचे सामान घेऊन दुचाकीवरून जातांना नामजप चालू होऊन शरीर हलके झाल्‍याचे जाणवणे

आम्‍ही सद़्‍गुरु दादांच्‍या घरून आरे तिठ्याकडे जातांना आमच्‍या समवेत सद़्‍गुरु दादांची ‘हँडबॅग’ घेतली होती. आम्‍ही दोघेही (अशोक आणि मी) ‘हँडबॅग’ आलटून पालटून गळ्‍यात घालून दुचाकीवरून प्रवास करत होतो. तेव्‍हा आमचे मन एकाग्र होऊन नामजप चालू झाला आणि आमचे शरीर हलके झाल्‍याचे जाणवले. त्‍या वेळी आमचे अंतर्मन गुरुमाऊलींच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करत असल्‍याचे आम्‍हाला जाणवले.

‘सेवेत असतांना गुरुदेव साधकांना चैतन्‍य आणि शक्‍ती पुरवून सेवेतील उत्‍साह द्विगुणित करतात’, याबद्दल सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

– डॉ.  रविकांत नारकर (वय ६५ वर्षे), पडेल, देवगड, जिल्‍हा सिंधुदुर्ग. (७.९.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक