रामनाथी आश्रमातील सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून जिज्ञासूंनी दिलले अभिप्राय

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. वैद्या (कु.) शीतल भारत सागर, मु.पो. आटपाडी, जिल्हा सांगली.

१. ‘सूक्ष्माविषयीचे शास्त्र शिकून भविष्यात अनिष्ट शक्तींपासून त्रास होऊ नये; म्हणून प्रयत्न करायला हवेत’, असे मला वाटले.

२. हे प्रदर्शन अत्यंत विचारपूर्वक आणि शास्त्रीयदृष्ट्या जतन केले आहे; म्हणून मला त्याविषयी आदर वाटला.’

२. वर्षा पंडित, जोगेश्वरी, मुंबई.

‘अशा (सूक्ष्म जगताविषयीच्या) गोष्टी अस्तित्वात आहेत’, याची मला जाणीवही नव्हती. हे प्रदर्शन मला एका वेगळ्या दृष्टीकोनातून पहाता आले. प्रदर्शनातील सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे जतन करण्यात आल्या आहेत.’

(३०.११.२०२२)