उद्या फाल्गुन कृष्ण द्वादशी (१९.३.२०२३) या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्या सौ. स्मिता संजय नाणोसकर यांचा ५१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या सहसाधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
सौ. स्मिता संजय नाणोसकर यांना ५१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. अनेक सेवा शांत आणि स्थिर राहून आनंदाने करणे
सौ. स्मिता नाणोसकर यांच्याकडे अनेक सेवा आहेत, उदा. नियमित सेवांव्यतिरिक्त साधकांचे डबे भरणे, सकाळचा अल्पाहार बनवणे, रुग्णालयात जाणार्या साधकाच्या समवेत जाण्यासाठी अन्य साधकाचे नियोजन करणे इत्यादी. या सर्व सेवा त्या शांत आणि स्थिर राहून आनंदाने करतात.
२. अभ्यासू वृत्ती
स्मिताताईंनी सेवेच्या संदर्भात सर्व साधकांचा अभ्यास केला आहे. त्यामुळे ‘कोणती सेवा कोणत्या साधकाला जमेल ?’, हे ताईंना लगेच समजते.
३. ताईंच्या बोलण्यात एक प्रकारचा आपलेपणा, गोडवा आणि चैतन्य आहे. त्यामुळे साधक त्यांनी सांगितलेल्या सेवा लगेच स्वीकारतात.
४. सकारात्मकता आणि साधकांना सेवेला उद्युक्त करण्याचे कौशल्य ताईंच्या बोलण्यातून सकारात्मक ऊर्जा येत असल्यामुळे आणि त्यांच्याकडे साधकांना सेवेला उद्युक्त करण्याची कला असल्यामुळे साधक थकलेला असला, तरीही सेवेला सिद्ध होतो. ताईंकडून येणार्या सकारात्मक ऊर्जेमुळे साधकही सकारात्मक होऊन सेवा करतात.’
– श्रीमती शशिकला भगत (वय ६६ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२९.३.२०२२)