गुरूंच्‍या शिकवणीशी एकरूप होण्‍याचे महत्त्व !

पू. संदीप आळशी

‘गुरूंचे स्‍थूल रूप म्‍हणजे त्‍यांचा देह, तर सूक्ष्म रूप म्‍हणजे त्‍यांची शिकवण ! साधक गुरूंच्‍या स्‍थूल रूपाशी नव्‍हे, तर सूक्ष्म रूपाशी एकरूप होऊ शकतो. गुरूंच्‍या सूक्ष्म रूपाशी, म्‍हणजे शिकवणीशी एकरूप होता येण्‍यासाठी गुरूंनी दिलेली शिकवण सतत आचरणात आणणे महत्त्वाचे असते. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले सनातन संस्‍थेच्‍या स्‍थापनेपासून साधकांना साधनेची सर्वांगांनी शिकवण देत आहेत. ‘त्‍यांची शिकवण आपण खरोखरच प्रतिदिन आचरणात आणतो का ?’, याचा साधकांनी अंतर्मुखतेने विचार करायला हवा.’

– (पू.) संदीप आळशी (७.२.२०२२)