१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी साधकाला ‘भावनाशीलता या स्वभावदोषावर ५ – ७ वर्षांनी मात करता येईल’, असे सांगणे
‘एकदा एका संतांचा निरोप देण्यासाठी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडे गेलो होतो. तेव्हा माझ्यातील भावनाशीलता या स्वभावदोषामुळे माझ्या साधनेत येणार्या अडचणींविषयी अकस्मात्च गुरुदेवांशी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी) बोलणे झाले. तेव्हा गुरुदेव मला म्हणाले, ‘‘काळजी करू नकोस, ५ – ७ वर्षांत ही अडचण दूर होईल. साधनेकडे लक्ष दे. सर्व ठीक होईल.’’
२. ‘ही अडचण सुटण्यासाठी ५ – ७ वर्षांचा कालावधी पुष्कळ अधिक आहे’, असे वाटणे; मात्र प्रत्यक्षात तेवढा कालावधी लागणे
त्या वेळी ‘भावनाशीलता या स्वभावदोषामुळे साधनेत येणारी ही छोटी आणि साधी अडचण दूर होण्यास ५ – ७ वर्षांचा कालावधी पुष्कळ अधिक आहे’, असे मला वाटले; मात्र वास्तवात ही अडचण दूर होण्यासाठी गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे ७ वर्षांचा कालावधी लागला. यातून मला पुन्हा एकदा गुरुदेवांचा द्रष्टेपणा अनुभवता आला.
श्री गुरूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’
– एक साधक, (१२.२.२०२३)