साधकांमध्ये संघटितभाव निर्माण करणार्‍या सद्गुरु स्वाती खाडये

सद्गुरु स्वाती खाडये

सद्गुरु स्वातीताई पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा येथे धर्मप्रचाराची सेवा करतात. ‘साधकांच्या साधनेतील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि त्यांनी साधनेच्या पुढच्या टप्याला जावे’, यासाठी सद्गुरु स्वातीताई त्यांना पुष्कळ प्रेमाने समजावून सांगून साधनेसाठी उद्युक्त करतात. ‘सद्गुरु स्वातीताईंनी ‘सर्व साधकांमधील समन्वय चांगला व्हावा’, यासाठी उत्तरदायी साधकांचा सत्संग घेतला. त्यांच्यामुळे सध्या आमच्या सर्वांचा चांगला समन्वय होत असून आम्ही संघटितभावाने एकत्रित सेवा करतो. ‘सद्गुरु स्वातीताईंनी आम्हा सर्वांना त्यांची प्रीती, चैतन्य आणि भाव यांच्या रेशमी धाग्यात गुंफून ठेवले आहे’, असे जाणवून पुष्कळ कृतज्ञता वाटते.’

– सौ. शारदा हुमनाबादकर (पुणे) आणि सौ. मीनाक्षी धुमाळ (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, गोवा)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक