शुक्रवारी श्री भवानीच्या दर्शनासाठी जाणे

सद्गुरु स्वाती खाडये यांनी साधकांकडून करून घेतलेले भावजागृतीचे प्रयोग !

सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये

आपण सर्व जण आई श्री भवानीच्या दर्शनासाठी जात आहोत. आपण आई भवानीचा नामजप करत गाभार्‍यात प्रवेश करत आहोत. तेथे आपल्याला मोठ्या प्रमाणात चैतन्य आणि शक्ती मिळत आहे. श्री भवानीमाता आपल्याला जवळ बोलावत आहे. तिने आपल्याला कुशीत घेतले आहे. ‘आई आम्हाला जवळ घेऊन साधनेसाठी बळ देत आहे’, असे आपण अनुभवत आहोत. ‘याच कृतज्ञताभावात पुढील साधनेचे प्रयत्न वाढवूया’, असे आपण ठरवत आहोत. (क्रमशः)

– सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था.

संग्राहक : श्री. महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४२ वर्षे), पुणे (५.१.२०२३)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक