१. प.पू. भक्तराज महाराज यांनी स्वप्नात येऊन घरकामात साहाय्य करणे, तेव्हा त्याची खंत वाटणे
एकदा प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) माझ्या स्वप्नात आले. ते मला घरकामात साहाय्य करत होते आणि ते माझ्याशी माझ्या घराविषयी काही बोलत होते. मला स्वप्नातून जाग आल्यावर ‘ज्यांच्या चरणी आम्ही वंदन करतो, त्यांच्याविषयी असे स्वप्न पडणे योग्य नाही’, या विचाराने माझ्या मनाला खंत वाटली.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर आईला आजारी असल्याचे कळवले नसूनही तिने अकस्मात् घरी येऊन घर आवरणे
काही दिवसांनी माझी प्रकृती बिघडल्यामुळे मी घरात काहीही काम करू शकत नव्हते. त्यामुळे सर्व घर अव्यवस्थित झाले होते. तेव्हा मी मनातून परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केली, ‘परात्पर गुरुदेवा, माझे घर किती अव्यवस्थित झाले आहे. हे घर रामनाथी आश्रमासारखे कधी होणार ?’ तेव्हा अकस्मात् माझी आई माझ्या घरी आली. तिला ‘मी आजारी आहे’, हे कळवले नव्हते. तिचे वय ७० वर्षे असून तिला मधुमेह आणि हृदयविकार आहे, तरीही तिने घरातील सर्व कामे शीघ्र गतीने पूर्ण केली. तेव्हा मला घर श्री गुरूंच्या आश्रमासारखे वाटू लागले.
३. ‘प.पू. भक्तराज महाराज यांनी आईच्या माध्यमातून घरी येऊन साहाय्य केले’, असे वाटणे
आई मला म्हणाली, ‘‘दळणवळण बंदीमुळे वाहने चालू नाहीत. त्यामुळे मी चालत आले.’’ माझे घर आईच्या घरापासून ३ कि.मी. दूर आहे. त्यामुळे एरवी आई आमच्या घरी आल्यावर १ – २ दिवस थांबते; परंतु आज दुपारचा भावसत्संग ऐकल्यावर ती तिच्या घरी गेली. आई भांडी घासतांना माझ्याशी ज्या गोष्टी बोलत होती, त्याच गोष्टी स्वप्नात प.पू. बाबा माझ्याशी बोलत होते. तेव्हा मला वाटले, ‘प.पू. बाबाच माझ्या साहाय्यासाठी आले आहेत.’
– श्रीमती पूनम अरोरा, फरिदाबाद (४.१०.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |