अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा कमांडर आणि राज्यपाल याची हत्या !

तालिबानचा वरिष्ठ कमांडर आणि बाल्ख प्रांताचा राज्यपाल दाऊद मुजम्मिल

काबुल (अफगाणिस्तान) – तालिबानचा वरिष्ठ कमांडर आणि बाल्ख प्रांताचा राज्यपाल दाऊद मुजम्मिल याची बाँबस्फोट घडवून हत्या करण्यात आली. दाऊद याच्या कार्यालयात घुसून बाँबस्फोट घडवण्यात आला.

यात एकूण २ जण ठार झाले. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आक्रमणाचे दायित्व अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. अफगाणिस्तानमध्ये गेल्या काही काळापासून ‘इस्लामिक स्टेट खुरासान प्रोव्हिन्स’ या आतंकवादी संघटनेकडून सातत्याने आतंकवादी कारवाया केल्या जात आहेत.