नामजपासहित सेवा करणार्‍या रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमातील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या श्रीमती भारती पालन (वय ६५ वर्षे) !

श्रीमती भारती पालन
सौ. वैशाली मुद्गल

१. शिकण्‍याची वृत्ती

‘श्रीमती भारती पालनकाकूंची बोली भाषा तुळू आहे. त्‍यांना मराठी बोलता येत नव्‍हते. आश्रमात आल्‍यावर त्‍यांनी मराठी भाषा शिकून घेतली. आता त्‍या मराठी भाषा बोलू लागल्‍या आहेत.

२. सेवेची तळमळ

धान्‍य सेवेत असणार्‍या साधकांकडे गुरुवारी अल्‍पाहाराच्‍या पूर्वसिद्धतेच्‍या सेवेला साधक अल्‍प असतात. हे त्‍यांना ठाऊक असल्‍यामुळे त्‍या घरी कितीही अडचण असली, तरीही आश्रमात येतात आणि अल्‍पाहाराची पूर्वसिद्धता करून जातात.

३. सेवा करतांना नामजप करणे

पालनकाकू सेवा करतांना एकाग्रतेने नामजप करतात. त्‍यांच्‍या जवळ सेवेला बसल्‍यावर माझाही नामजप चालू होतो.

४. अनुभूती

श्रीमती पालनकाकूंची पातळी घोषित झाल्‍यावर त्‍या मनोगत व्‍यक्‍त करत असतांना मला चंदनाचा सुगंध येत होता.’

– सौ. वैशाली मुद़्‍गल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.११.२०२२)