बुधवारी पंढरपूरला जाऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेणे
१. चंद्रभागा नदीत स्नान केल्यावर शरिराच्या भोवती आलेले अनिष्ट शक्तीचे आवरण दूर होणे : आपण पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जात आहोत. पंढरपूरला जातांना दैवी वातावरणातील पालट अनुभवण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्व साधक, संत आणि सद़्गुरु विठूचा गजर करत पायी चालत आहेत. आपण आध्यात्मिक स्तरावर वारी अनुभवण्याचा प्रयत्न करत आहोत. पंढरपूरला पोचल्यावर चंद्रभागा नदीत स्नान केल्यावर आपल्या शरिराच्या भोवती आलेले अनिष्ट शक्तीचे आवरण दूर झाले आहे.
२. पांडुरंगाच्या मूर्तीजवळ गेल्यावर ‘साक्षात् परात्पर गुरु डॉ. आठवले समोर आहेत आणि ते वाट बघत आहेत’, असे दिसणे, त्यांनी सर्वांची विचारपूस करणे आणि सर्वांना प्रसाद अन् सुवासिक बुक्का देणे : श्री विठ्ठल मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर आपल्याला पुष्कळ हलके वाटत आहे. आपल्या मनातील अनावश्यक विचार नष्ट होत आहेत. त्या वेळी आपल्या मनात ‘कधी एकदा पांडुरंगाला भेटीन ?’, हा एकच विचार आहे. मंदिराच्या आत प्रवेश केल्यावर आपण जसजसे पांडुरंगाच्या मूर्तीकडे जात आहोत, तसतसे आपल्याला भावाश्रू येत आहेत. ‘आता काहीच नको’, असे आपल्याला वाटत आहे. ‘आपण मूर्तीच्या जवळ गेल्यावर साक्षात् गुरुराया समोर आहेत आणि ते आपली वाट बघत आहेत’, असे आपल्याला दिसत आहे. आपण त्यांच्या चरणांवर नतमस्तक झाल्यावर ते आपल्याला विचारत आहेत, ‘तुम्ही सर्व कसे आहात ? प्रवास कसा झाला ? तुम्हा सर्वांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न कसे चालू आहेत ? तुम्हाला काही अडचण येत नाही ना ? तुम्ही सर्व जण आनंदी आहात ना ?’ गुरुदेवांनी विचारलेल्या या सर्व प्रश्नांमुळे आपले मन गहिवरून येत आहे. आपल्याकडून कृतज्ञता व्यक्त होत आहे. गुरुदेव आपल्याला चुरमुरे आणि बत्तासे यांचा प्रसाद देत आहेत. त्यांनी आपल्या हातात सुवासिक बुक्का दिला आहे. आपण गुरुदेवांच्या चरणी मनोमन कृतज्ञता व्यक्त करत आहोत. (क्रमश:)
– सद़्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था.
संग्राहक : श्री. महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४२ वर्षे), पुणे (५.१.२०२३)
|