‘शाळेत नमाजपठण होत असल्‍याचे ठाऊक नाही’, असे म्‍हणणारे मुख्‍याध्‍यापक असलेल्‍या शाळेतील विद्यार्थी कसे असतील ? याची कल्‍पना करता येत नाही !

शाळेत नमाज पठण करणारी शिक्षिका

‘भोपाळ येथील राशीदिया शाळेत २ शिक्षिकांनी विद्यार्थ्‍यांना वर्गाबाहेर काढून स्‍वतः वर्गातच नमाजपठण केले. २८ फेबु्रवारी या दिवशी ही घटना घडली. ‘या शाळेत प्रत्‍येक शुक्रवारी विद्यार्थीही नमाजपठण करतात. या शाळेचे मुख्‍याध्‍यापक के.डी. श्रीवास्‍तव यांना याविषयी विचारले असता त्‍यांनी ‘याविषयी मला काहीही ठाऊक नाही आणि असा प्रकार मी कधीही शाळेत पाहिला नाही’, असे उत्तर दिले.’ (२.३.२०२३)