|
नाशिक – येथील सप्तश्रृंगीदेवीच्या मंदिरात चोरांनी दानपेटीतील रक्कम चोरली. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेर्याला चुना लावून हे कृत्य केले. या घटनेला २० दिवस उलटूनही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. (हा हिंदूंच्या निष्क्रीयतेचाच परिणाम ! अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात असा प्रकार घडला असता, तर ते आतापर्यंत रस्त्यावर उतरले असते ! – संपादक) या मंदिराच्या परिसरात विविध ठिकाणी दानपेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यातील एका दानपेटीतील रक्कम चोरण्यात आली आहे. त्यांनी किती रक्कम चोरली, हे अजून समजलेले नाही. या दानपेटीत भाविकांनी टाकलेल्या अनेक नोटा जळालेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत.
#सप्तशृंगी #देवीच्या #मंदिरात चोरी; #सीसीटीव्हीला फासला #चुनाhttps://t.co/G4EwQdYQdz#saptashrungi #devitemple #nashik #CCTVCamera #NewsUpdate
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) March 4, 2023
मंदिराचे विश्वस्त दीपक पाटोदकर यांनी मंदिर संस्थान अध्यक्षांना तात्काळ गुन्हा नोंदवण्याच्या दृष्टीने पत्र दिले आहे. त्यांनी सांगितले, ‘‘सप्तश्रृंगीदेवीच्या मंदिराच्या परिसरातील दानपेटीतून पैसे चोरण्याचा घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर वेतन देऊन सुरक्षा महामंडळाकडून घेतलेल्या सुरक्षारक्षकांच्या देखरेखीखाली मंदिर परिसर असतांना असे प्रकार घडणे अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणी चौकशी करून गुन्हा नोंदवायला हवा.’’
संपादकीय भूमिकाहिंदूंनो, मंदिरांमध्ये वारंवार होणार्या चोर्या रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे, हे लक्षात घेऊन त्यासाठी संघटित व्हा ! |