गोमय लाकूड सिद्ध करण्याचा नवीन प्रयोग !

सोलापूर – होळी सणाच्या पार्श्वभूमीवर हिप्परगा येथील ‘तेजामृत’ गोशाळेचे संचालक देविदास मिटकरी यांनी गोमय लाकूड सिद्ध करण्याचा नवीन प्रयोग केला आहे. शेणापासून सिद्ध केल्या जाणार्‍या या लाकडाचा सार्वजनिक होळीतही वापर केला जाऊ शकतो. या एका लाकडाचे मूल्य १० रुपये असून लांबी २ फूट, तर रुंदी ३ इंच  आहे. शहरात एकूण ११ गोशाळा असून या सर्व गोशाळेत गोवर्‍या सिद्ध करण्याचे काम गतीने चालू आहे.

गोमय लाकूड सिद्ध करण्याची नवीन संकल्पना ! – देविदास मिटकरी, संचालक ‘तेजामृत’ गोशाळा

शेणापासून गोमय लाकूड सिद्ध करणे, ही नवीन संकल्पना असून याप्रकारे प्रथमच लाकडाची निर्मिती केली जात आहे. होळीच्या उत्सवासाठी मागणीनुसार या लाकडांची निर्मिती केली जात आहे.