फाल्गुन पौर्णिमा (७ मार्च २०२३) या दिवशी सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…
सद्गुरु स्वाती खाडये यांच्या चरणी सनातन परिवाराचा शिरसाष्टांग नमस्कार !
सद्गुरु स्वाती खाडये यांचा ७ मार्च २०२३ (फाल्गुन पौर्णिमा) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने सद्गुरु स्वाती खाडये आणि साधक यांना वानराच्या रूपातून मारुतिरायांनी दर्शन दिल्याची आलेली अनुभूती पाहूया.
१. गाडीत साधक साधनेविषयी बोलतांना अकस्मात् दोन वानर गाडीच्या ‘बॉनेट’वर चढून बसणे, त्यांच्याकडे पाहून बालसाधिकेने ‘हनुमंतराया !’, असे उद्गारणे !
दुपारी साधारण ३ वाजता श्री मांढरदेवी देवस्थानाकडे जाणार्या घाटातून गाडी जात असतांना साधक साधनेविषयी बोलत आणि नामजप करत होते. अकस्मात् दोन वानर गाडीच्या ‘बॉनेट’वर येऊन बसले. एक वानर गाडीच्या ‘बॉनेट’वर आणि दुसरे वानर गाडीच्या डाव्या बाजूला असलेल्या आरशावर बसले होते. वानरांकडे पाहून प्रार्थना (कु. प्रार्थना पाठक, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ११ वर्षे,) उद्गारली, ‘हनुमंतराया !’
२. दुपारची वेळ असल्यामुळे ‘बॉनेट’ तापले असूनही वानर त्यावर शांतपणे बसणे, तेव्हा ‘मारुतिराय सद्गुरु स्वाती खाडये यांना दर्शन देण्यासाठी आले आहेत’, असे जाणवणे
दुपारची वेळ असल्याने ‘बॉनेट’ तापले होते, तरी ते वानर शांतपणे ‘बॉनेट’वर बसले होते आणि ते अगदी स्थिरपणे सद्गुरु स्वातीताईंकडे पहात होते. ते शांत आणि तेजस्वी दिसत होते. ‘ते दैवी वानर असावे आणि सद्गुरु स्वातीताईंना दर्शन देण्यासाठी आले असावे. जणू वानराच्या माध्यमातून साक्षात् मारुतिरायांनीच दर्शन दिले’, असे मला जाणवले.
३. कृतज्ञता
कलियुगातील या घोर आपत्काळातही सद्गुरु आणि संत यांचा सहवास देऊन अन् अनेक दैवी अनुभूतींतून भगवंत किती आनंद अन् चैतन्य देत आहे ! ‘तो त्याच्या अस्तित्वाची साक्ष कशी देतो ?’, याची मला अनुभूती आली. कृतज्ञता भगवंता !
४. प्रार्थना
‘आम्हाला सद्गुरु स्वातीताईंचा सत्संग अखंड लाभू दे आणि त्यांच्याकडून आम्हाला शिकता येऊ दे’, अशी श्री गुरूंच्या चरणी प्रार्थना आहे !’
– गुरुचरणी,
सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के, वय ४१ वर्षे), पुणे (२१.२.२०२३)