नम्र, शिकण्यातील आनंद अनुभवणारे आणि सनातनच्या तिन्ही गुरूंप्रती अपार भाव असलेले रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. अक्षय पाटील (वय २८ वर्षे) !

फाल्गुन शुक्ल त्रयोदशी (५.३.२०२३) या दिवशी श्री. अक्षय पाटील यांचा २८ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांच्या पत्नीला (सौ. अनन्या अक्षय पाटील यांना) त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्री. अक्षय पाटील

श्री. अक्षय पाटील यांना २८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. आनंदी 

‘श्री. अक्षय नेहमी आनंदी असतात. ‘त्यांना एखाद्या प्रसंगात ताण येऊन निराशा आली किंवा ते संघर्षामुळे नकारात्मक झाले’, असे मी कधीही पाहिले नाही.

२. नम्रतेने बोलणे

सौ. अनन्या पाटील

ते आतापर्यंत माझ्याशी कधीही ‘नवरा’ या भूमिकेतून वागले नाहीत. ते मला मित्राप्रमाणे सगळ्या गोष्टी सांगतात आणि विचारतात. त्यांना एखादी वस्तू हवी असल्यास ते मला ‘साहाय्य करू शकतेस का ?’, असे विचारतात. पत्नीशी नम्रतेने बोलणे आणि वागणे, हे त्यांच्यातील साधकत्व दर्शवते.

३. शिकण्यातील आनंद अनुभवणे 

ते ‘सॉफ्टवेअर इंजिनीयर’ आहेत. त्यांना त्या क्षेत्रातील पुष्कळ माहिती आहे, तरीही त्यांच्यात ‘शिकण्याची वृत्ती, जिज्ञासा आणि चिकाटी’, हे गुण आहेत. ते ‘सेवा आणखी सोप्या पद्धतीने करण्यासाठी तसेच, सेवेतील अडचणींवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी विविध तंत्रज्ञान अभ्यासतात. अडचण सुटत नाही, तोपर्यंत ते त्या क्षेत्रात तज्ञ असलेले त्यांचे मित्र आणि नातेवाईक इत्यादींचे मत घेऊन अभ्यास करून प्रयत्न करतात.

४. कौशल्य 

त्यांच्यामध्ये संगणकीय क्षेत्रासह चित्र काढणे, विविध कलाकृती करणे, पाककला, संरचना (‘फॉरमॅटिंग’) करणे, ध्वनीचित्रफितींचे (व्हिडिओचे) संकलन करणे, ‘फोटोशॉप’मध्ये छायाचित्रात सुधारणा करणे, अशा अनेक गोष्टींचे कौशल्य आहे.

५. पत्नीला स्वयंपूर्ण बनवणे

अ. मी लहानपणापासून आश्रमात रहात असल्यामुळे बाह्य जगातील व्यावहारिक गोष्टींशी माझा अधिक संपर्क आला नाही. श्री. अक्षय यांनी मला सर्व गोष्टी सहजतेने शिकवून अनेक गोष्टींत स्वयंपूर्ण होण्यास शिकवले.

आ. त्यांना राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात अन् अन्याय यांविषयी चीड आहे. ते मला स्वसंरक्षणासाठी कशा प्रकारे सिद्ध असायला हवे, ते शिकवतात.

६. अक्षय घरातील निर्णयांत आणि साधनेतही माझे मत विचारतात. मी त्यांच्याशी कोणत्याही विषयावर मनमोकळेपणाने बोलू शकते.

७. पत्नीला तिच्यातील ‘स्वभावदोष आणि अहंचे पैलू’ यांवर मात करण्यासाठी साहाय्य करणे

माझ्यातील ‘भावनाशीलता आणि भिडस्तपणा’ या स्वभावदोषांमुळे मला इतरांच्या चुका स्पष्टपणे सांगता येत नाहीत. त्या प्रसंगात मला साधनेच्या स्तरावर सांगणे, माझ्या उत्तरदायी साधकांना सांगून माझ्या अडचणी सोडवण्यासाठी आणि स्वभावदोष अन् अहं यांवर मात करण्यासाठी अनेक प्रसंगांत त्यांनी मला साहाय्य केले.

८. पत्नीकडून कौतुकाची अपेक्षा न करता तिला साधनेत साहाय्य करण्यास सांगणे

मला त्यांच्यातील विविध गुण जाणवल्यावर एकदा मी त्यांना सहज म्हणाले, ‘‘तुमच्या गुणांची सूची काढली, तर किती मोठी होईल !’’ तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘‘तुला सूची करायची असेल, तर माझ्यातील स्वभावदोष आणि अहंचे पैलू यांची कर. मला साधनेत पुढे जाण्यासाठी त्याची आवश्यकता आहे.’’

९. अक्षय यांच्यात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे.

‘हे श्रीमन्नारायणा, तू मला साधनेच्या वाटेवर अक्षयरूपी अनमोल सखा दिला आहेस. त्यांच्याकडून मला सदैव शिकता येऊ दे. मला त्यांच्यासारखे प्रयत्न करता येऊन आम्हा दोघांना तुझ्या चरणी समर्पित होता येऊ दे’, हीच तुझ्या चरणी प्रार्थना !’

– सौ. अनन्या अक्षय पाटील (श्री. अक्षय यांची पत्नी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.११.२०२२)