रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पाहून मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

१. ‘मी रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला दुसर्‍यांदा भेट दिली. तेव्‍हा मला पहिल्‍या भेटीप्रमाणेच पुष्‍कळ चैतन्‍य मिळाले.

२. येथे सगळे काही व्‍यवस्‍थित आहे.

३. येथे सगळे साधक आणि साधिका आनंदमय वातावरणात रहातात.’

– श्री. प्रमोद फडते, टाईल्‍स व्‍यावसायिक, ‘सनातन प्रभात’चे वाचक आणि विज्ञापनदाता, चिंबल, गोवा. (२.११.२०२२)

१. ‘रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात कल्‍पना करू शकत नाही, असे वेगळेच वातावरण आहे आणि आध्‍यात्मिकता आहे’, असे मला वाटले.

२. येथील सर्वांचे चेहरे आनंदी आहेत.

३. सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून : सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून ‘सगळीकडे दैवी शक्‍ती कार्यरत आहे’, असे मला वाटले.’

– सौ. संध्‍या प्रमोद फडते, चिंबल, गोवा. (२.११.२०२२)

  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार मान्यवरांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक