मंदीमुळे पाकिस्तानवर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन रोखण्याची वेळ !

इस्लामाबाद – पाकमधील अर्थिक मंदी दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून पाकवर सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन रोखण्याची वेळ ओढावली आहे. पाकच्या अर्थमंत्रालयाने केंद्रीय आणि त्याच्याशी संबंधित विभागांतील कर्मचार्‍यांचे वेतन रोखण्याचा आदेश दिला आहे. देशाची अर्थव्यवस्था अत्यंत कठीण काळातून जात असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’कडून कर्ज मिळण्यासाठी सध्या पाक त्यांच्या अटी पूर्ण करत असल्याची माहिती पाकचे अर्थमंत्री इशाक डार यांनी दिली. याअंतर्गत पाकने अनेक अनुदाने बंद केली आहेत. जीवनावश्यक वस्तूंवरील आयातशुल्कात १७ टक्क्यांवरून २५ टक्के इतकी वाढ केली आहे.