पोलिसात नोकरी देण्‍याचे आमीष दाखवून ३ लाख ९० सहस्र रुपयांची फसवणूक !

  • हिंगोली येथील घटना !   

  • एकाविरुद्ध गुन्‍हा नोंद

हिंगोली – येथील एका तरुणीला पोलीस विभागात नोकरी देण्‍याचे आमीष दाखवून ३ लाख ९० सहस्र रुपयांची फसवणूक करण्‍यात आली. या प्रकरणी फसवणूक झालेल्‍या तरुणीच्‍या तक्रारीवरून बाळापूर पोलीस ठाण्‍यात एकाविरुद्ध गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे. रंजना तुकाराम पोटे (वय २१ वर्षे) असे फसवणूक झालेल्‍या तरुणीचे नाव आहे. नागोराव सुखदेव श्रीरामे याने तिला आमीष दाखवले होते. फसवणूक झाल्‍याचे समजल्‍यावर तिने श्रीरामे याच्‍याकडे पैसे मागितले; पण तोपर्यंत तो पळून गेला. त्‍याने अशा प्रकारे अनेकांची अशा प्रकारे फसवणूक केली असल्‍याचे समजले.