१. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील लागवड पहातांना आलेल्या अनुभूती
१ अ. प.पू. दास महाराज यांचे दर्शन झाल्यावर ‘साक्षात् मारुतिरायांनी दर्शन दिले’, असे वाटून भाव जागृत होणे : ‘गुरुमाऊलीच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने मी रामनाथी आश्रमातील लागवड पहाण्यासाठी जात असतांना मला प.पू. दास महाराज यांचे दर्शन झाले. तेव्हा ‘साक्षात् मारुतिरायांनी दर्शन दिले’, असे वाटून माझा कृतज्ञताभाव जागृत झाला.
१ आ. लागवडीमध्ये गेल्यावर तेथील आंब्याची झाडे आणि फुले पाहून ‘ते सर्व ध्यान करत आहेत’, असे मला जाणवले.
२. रामनाथ मंदिरातून निघत असतांना सूक्ष्मातून नागदेवतेने दर्शन दिल्याचे जाणवणे
रामनाथ मंदिरात गेल्यावर ‘प्रत्यक्ष नागदेवता तेथे आहेे’, असे मला जाणवले. आम्ही मंदिरातून निघत असतांना ‘साक्षात् शेषनागाने दर्शन देऊन आम्हा साधकांना आशीर्वाद दिला’, असे मला वाटले. त्या वेळी माझा भाव जागृत झाला.
‘हे सर्व परात्पर गुरु डॉक्टर यांच्या कृपेनेच अनुभवायला मिळाले’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता !’
– सौ. योगिता औटी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ३६ वर्षे), राजगुुरुनगर, पुणे. (३०.९.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |