नामजप करतांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या नावाविषयी देवाने सुचवलेले विचार !

सर्व साधकांचा आधार असलेले सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘मी नामजप करत असतांना ‘परित्राणाय साधूनां  विनाशाय च दुष्‍कृताम् । धर्मसंस्‍थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥’, हे भगवंताचे वचन आहे. ‘त्‍यात आणि परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या नावात काही साधर्म्‍य आहे का ?’, असा प्रश्‍न माझ्‍या मनात निर्माण झाला अन् देवानेच मला त्‍याचे यथायोग्‍य उत्तर सुचवले. ते पुढे दिले आहे.

श्री. राजन दळवी

१. जयंत : जय + अंत = जयंत. ‘जय’ म्‍हणजे ‘धर्म-अधर्म यांच्‍या लढ्यात साधकांना विजयश्री मिळवून देऊन त्‍यांचे रक्षण करणारे’ आणि ‘अंत’ म्‍हणजे ‘अधर्मी वृत्तींचा नाश करणारे’, असे ‘जयंत’.

२. आठवले : आठ + वलये =  ‘अष्‍टांग साधनेचे (टीप) वलय धारण करून ते प्रक्षेपित करणारे’, ते ‘आठवले’.

समाजाकडे अष्‍टांग साधनेचे ज्ञान प्रक्षेपित करून समाजाकडून त्‍याविषयीची प्रत्‍यक्ष कृती करून घेणारे आणि या कलियुगात धर्मसंस्‍थापना करणारे ‘आठवले’.

टीप – १. स्‍वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन, २. अहं-निर्मूलन, ३. नामजप, ४. भावजागृतीसाठी करायचे प्रयत्न, ५. सत्‍संग, ६. सत्‍सेवा, ७. सत्‌साठी त्‍याग आणि ८. प्रीती (इतरांविषयी निरपेक्ष प्रेम)

अनुभूती : देव मला वरील अर्थ सुचवत असतांना काही क्षण माझ्‍या डोळ्‍यांत भावाश्रू आले. त्‍या वेळी माझ्‍या अंगावर शहारे येत होते.’

– श्री. राजन दळवी, भांडुप, मुंबई. (९.९.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक