धर्माचरणाची आवड असणारी ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली शिवडी, मुंबई येथील कु. नैवेद्या संदीप वैती (वय ८ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. नैवेद्या वैती ही या पिढीतील एक आहे !

‘माघ कृष्ण नवमी (रामदास नवमी) (१५.२.२०२३) या दिवशी मुंबई येथील कु. नैवेद्या संदीप वैती हिचा ८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या वडिलांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. नैवेद्या वैती

कु. नैवेद्या संदीप वैती हिला ८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

–  सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले,

१. जिज्ञासू वृत्ती

‘कु. नैवेद्याला प्रत्येक नवीन वस्तूविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा असते. ती त्या वस्तूविषयी ‘का ? आणि कसे ?’, असे प्रश्न विचारून स्वतःचे शंकानिरसन करून घेते.

२. रुग्णाईत आजोबांची काळजी घेणे

नैवेद्याचे आजोबा रुग्णाईत असल्यास ती वेळोवेळी त्यांची विचारपूस करते. ती आजीला ‘त्यांना औषध दिलेस का ?’, असे विचारते. आजोबांना काही हवे असल्यास नैवेद्या त्यांना आणून देते. आजोबांचे जेवण झाल्यावर ती त्यांचे ताट स्वयंपाकघरात नेऊन ठेवते.

३. धर्माचरणाची आवड

नैवेद्या अंघोळ झाल्यानंतर नियमित सूर्याला अर्ध्य देते. ती शाळेत जातांना नेहमी कुंकू लावते. ती शाळेत जाण्यापूर्वी नियमित गणपति, श्रीकृष्ण, देवी आणि श्रीगुरु यांचे श्लोक म्हणते.

४. विविध कृती करतांना नामजप करणे

नैवेद्या दिवसभरात विविध कृती करतांना, उदा. शाळेत जातांना, शिकवणीला जातांना, बैठी कामे करत असतांना नामजप करते. तिला याविषयी विचारले असता ती सांगते, ‘‘नामजप करत असतांना मला श्रीकृष्णबाप्पा दिसतो आणि तो माझ्याकडे पाहून हसतो.’’

५. ती मला प्रतिदिन संध्याकाळी दिवसभरात केलेल्या साधनेच्या प्रयत्नांचा आढावा देते.

६. चुकांविषयी संवेदनशील

अ. तिला तिच्याकडून झालेल्या चुकीची जाणीव करून दिली आणि क्षमा मागायला सांगितली की, ती लगेच क्षमा मागते.

आ. तिच्याकडून काही चूक झाली असल्यास आम्ही तिला उठाबशा काढण्याची शिक्षा देतो. तेव्हा ती शिक्षा पूर्ण करते.

७. स्वभावदोष

चिडचिड करणे आणि दूरचित्रवाणी अन् भ्रमणभाष (मोबाईल) यांवर चलचित्रे (व्हिडिओ) पहाणे.’

– श्री. संदीप नरेंद्र वैती (कु. नैवेद्या हिचे वडील), शिवडी, मुंबई. (१७.१.२०२३)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.