नवीन रेल्वे मार्गाच्या निर्मितीमध्ये येणार्‍या मंदिरातील श्री हनुमंताला रेल्वे प्रशासनाची नोटीस !

  • श्री हनुमंताला ठरवले अतिक्रमणकर्ता !

  • श्री हनुमंताने स्वतःहून मंदिर न हटवल्यास प्रशासनाकडून ते हटवून त्याचा खर्च वसूल करण्याची चेतावणी !

 

मुरैना (मध्यप्रदेश) – येथे रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या भूमीवर असणार्‍या श्री हनुमान मंदिरातील भगवान श्री हनुमान यांना नोटीस बजावली. या नोटिसीमध्ये श्री हनुमंताला अतिक्रमणकर्ता ठरवून ७ दिवसांत मंदिर हटवण्यास सांगितले आहे. जर मंदिर हटवले नाही, तर रेल्वे प्रशासन स्वतःहून कारवाई करील आणि त्याचा खर्चही वसूल करील.

ग्वाल्हेर-श्योपूर ‘ब्रॉडगेज रेल्वे लाईन’चे काम चालू आहे. सबलगड तालुक्यामध्ये हनुमान मंदिर या मार्गाच्या मधे येत आहे. ही भूमी रेल्वेची असून त्यावर हे मंदिर उभारण्यात आले आहे. यामुळे रेल्वेने थेट श्री हनुमंतालाच नोटीस बजावली आहे.

संपादकीय भूमिका

रेल्वे प्रशासन कधी चर्च आणि मशीद यांना अशा प्रकारे नोटीस पाठवून त्यानुसार  कारवाई करते का ?