माझी भूमी मशिदीसाठी देणार नाही : हिंदू बांधवांनी मंदिर बांधावे ! – मुसलमान व्यक्तीचे आवाहन

अन्य मुसलमानांच्या जाचाला कंटाळून निर्णय !

मुरैना (मध्यप्रदेश) – मी माझी भूमी मशिदीसाठी देणार नाही, त्यावर हिंदू बांधवांनी मंदिर बांधावे, असे आवाहन येथील चौरा भागात रहाणारे युसुफ खान यांनी हिंदूंना केले. अन्य काही मुसलमान व्यक्तींकडून होणार्‍या मनस्तापाला कंटाळून खान यांनी ही भूमिका घेतली.

खान यांचे जौरा येथील एका मशिदीबाहेर घर आहे; मात्र मशिदीच्या व्यवस्थापनाचा खान यांचे घर पाडून त्यांची भूमी मशिदीसाठी घेण्याचा डाव आहे. यास खान यांचा विरोध आहे. त्यामुळे खान यांनी ही भूमी मंदिरासाठी देण्याची, तसेच मंदिर उभारण्यासाठी साहाय्य करण्याची सिद्धता दर्शवली. ‘मशिदीच्या व्यवस्थापनाने मला कोट्यवधी रुपये दिले, तरी मी माझी भूमी मशिदीसाठी देणार नाही’, अशी ठाम भूमिकाही त्यांनी घेतली आहे.

आक्रमण होऊनही पोलिसांकडून दुर्लक्ष !

युसुफ खान यांच्या म्हणण्यानुसार, मशिदीमध्ये नमाजपठणासाठी येणार्‍या काही जणांनी त्यांच्यावर आक्रमण केले होते. आक्रमणकर्त्यांपासून वाचण्यासाठी ते घरात जीव मुठीत धरून लपून बसले होते. याविरोधात त्यांनी पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली; परंतु पोलिसांकडून अद्याप याविषयी कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.

हिंदु धर्म स्वीकारण्यास सिद्ध !

अन्य मुसलमानांकडून होत असलेल्या त्रासामुळे खान हे आता हिंदु धर्म स्वीकारण्यासाठीही सिद्ध आहेत. गेल्या ३ वर्षांपासून मला त्रास दिला जात आहे. त्यामुळे आता मी आता हिंदु धर्म स्वीकारणार आहे.

संपादकीय भूमिका

स्वतःच्या धर्मबांधवांचाही जाच करणारे मुसलमान हिंदूंशी कसे वागत असतील ?, याचा विचारच न केलेला बरा !